Palmistry for Foreign Travel: हस्तरेषाशास्त्र भविष्य बघण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमधली एक पद्धत आहे. तळहातांवरच्या रेषा, उंचवटे यांच्या अभ्यासातून भविष्यातील अनेक घडामोडींबाबत भाकीतं केली जातात. कुंडलीशास्त्र किंवा अंकशास्त्र यावर जसा नवग्रहांचा प्रभाव असतो अगदी तसेच हस्तरेषांवरही नवग्रहांचा प्रभाव असतो. हाताचा आकार, बोटं, अंगठा, नखं, शुक्र कंकण, शनिकंकण, गुरुकंकण, रविरेषा, आयुष्यरेषा, मस्तकरेषा, हृदयरेषा आणि मणिबंधरेषा यांचा अभ्यास केला जातो. हातावरील रेषा परदेश प्रवासाविषयीही सांगतात. एखादी व्यक्ती परदेशात जाऊ शकते की नाही? जर एखादी व्यक्ती परदेश दौऱ्यावर जाणार असेल तर प्रवास किती वेळा करेल? एवढेच नाही तर काही वर्षे परदेशात राहिल्यानंतर ती व्यक्ती परत येईल किंवा परदेशात मृत पावेल हेही कळू शकते.
हस्तरेषांवरून परदेश प्रवासाचे योग बघा
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)