Panchak Date December 2022 : मंगळवारपासून सुरु होणाऱ्या पंचकांना अग्नी पंचक (Agni Panchak 2022) म्हणतात. पंचकचा काळ अनेक कामांसाठी शुभ मानला जात नाही. हिंदू धर्म आणि ज्योतिष शास्त्रामध्ये पंचक कालावधीच्या 5 दिवसांसाठी अनेक नियम दिलेले आहेत, ज्यामध्ये काही वस्तू खरेदी करणे आणि काही शुभ कार्ये करण्यास सक्त मनाई आहे.त्यामुळे या काळात नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? आणि कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, हे जाणून घेऊयात.
पंचक (Panchak) या शब्दाचा अर्थच मुळात शुभ कार्य न करणे असा होतो.ज्योतिष शास्त्रानुसार (astrology) पंचक हे शुभ नक्षत्र मानलं गेलं नाहीये.जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा त्या काळाला पंचक म्हणतात. जेव्हा चंद्र या पाच राशीत प्रवेश करतो, पाच नक्षत्र म्हणजे घृष्ट, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती, त्या कालावधीला पंचक म्हणतात.
वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातील मंगळवारपासून पंचक (Panchak) सुरू होत असून, अग्नी पंचक असेल. अग्नी पंचक सर्वात शुभ मानले गेले आहे. हिंदू पंचांगानुसार, या वेळचे पंचक मंगळवार, 27 डिसेंबर 2022 रोजी पहाटे 3:31 वाजता सुरू होईल, जे शनिवार, 31 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11:47 वाजता समाप्त होईल. या काळात नागरीक 2022 ला निरोप आणि 2023 वर्षाचे स्वागत करण्याच्या उत्सवात मग्न होतील. परंतु त्यांनीही काही खबरदारी घ्यावी कारण अग्निपंचका (Agni Panchak 2022) दरम्यान अपघात होण्याची दाट शक्यता असते.
दरम्यान पंचक काळात जर तुम्ही वरील गोष्टी टाळल्या तर तुमच्या आयुष्यात कोणतेही संकट येणार नाही. त्यामुळे या गोष्टी चुकूनही करू नका.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी 24 तास' याची खातरजमा करत नाही.)