Ram Navami 2024 : रामनवमीला 'या' पदार्थांचा नैवेद्य दाखवा, श्रीरामाचा मिळेल आशीर्वाद

Ram Navami 2024 : रामनवमीच्या शुभ दिवशी घरात श्रीप्रभू यांना खास नैवेद्य अर्पण करा. हे पदार्थ कुठले आहे ज्यामुळे श्रीराम प्रसन्न होतील जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Apr 16, 2024, 03:08 PM IST
Ram Navami 2024 : रामनवमीला 'या' पदार्थांचा नैवेद्य दाखवा, श्रीरामाचा मिळेल आशीर्वाद  title=
Ram Navami 2024 Offer these bhog prasad offer on Ram Navami get blessings of Lord Rama

Ram Navami 2024 : अयोध्येसह जगभरातील राम मंदिरात रामनवमीची जय्यत तयारी सुरु आहे. धार्मिक ग्रंथानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला राम नवमी साजरी करण्यात येते. यंदा रामनवमी 17 एप्रिलला साजरी करण्यात येणार आहे. राम नवमी या शुभ दिनी श्रीप्रभूला प्रसन्न करण्यासाठी कुठल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करायला पाहिजे हे भक्तांना माहिती आहे. ज्योतिषचार्य आनंद पिंपळकर यांनी तुम्ही श्रीरामाला पाच पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करु शकतात. ते कुठले पदार्थ आहे आणि त्याचे महत्त्व आहे जाणून घ्या.  (Ram Navami 2024 Offer these bhog prasad offer on Ram Navami get blessings of Lord Rama)

राम नवमी भोग किंवा नैवेद्य

पंजिरी - धणे, तूप आणि साखरेचा हा पदार्थ श्रीराम यांच्या सर्वात आवडीचा आहे. या पदार्थाला पंजिरी असं म्हणतात. त्यामुळे रामनवमीला पंजिरीचं नैवेद्य करुन त्यात तुळशीचं पान घालून रामलल्लाला अर्पण करा. यामुळे घरात सुख समृद्धी नांदते आणि वैवाहिक जीवनात गोडवा राहतो. 

तांदळाची खीर - पंजिरीनंतर श्रीरामाला आवडते ती म्हणजे तांदळाची खीर. रामनवमीला देवाला खीर अर्पण केल्यास देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. यामुळे अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार, कौशल्या मातेने तांदळाची खीर खाल्ली. त्यानंतर कौशल्या मातेच्या पोटी श्रीरामाचा जन्म झाला. त्यामुळे रामनवमीला खीर करण्याची परंपरा आहे. 

पंचामृत - शास्त्रांमध्ये भगवान विष्णूच्या पूजेमध्ये पंचामृताचे विशेष महत्त्व असून त्याशिवाय रामनवमीला श्री हरी आणि त्यांच्या अवतारांची पूजा करुन अर्पण करण्यात येतं. दूध, दही, तूप आणि साखरेचे पंचामृत आयुष्यात सुख समृद्धी आणतं. 

कंदमूल - रामनवमीला भगवान रामाला कंदमूल किंवा गोड मनुका फार प्रिय आहे. पौराणिक कथेनुसार, प्रभू रामाने वनवासात असताना कंद ग्रहण केली होती. अशी मान्यता आहे की, या नैवेद्यामुळे कुटुंबात आनंद राहतो. सुख-समृद्धी नांदते. 

केशर भात - रामनवमीला श्रीरामाला केशर भात अपर्ण करावा. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होते. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)