आता तुमच्या डोक्यावरील केस सांगणार तुमचा स्वभाव; Samudra Shastra मध्ये दडलंय रहस्य

आज आम्ही तुम्हाला इतरांचा स्वभाव आणि वागणूक जाणून घेण्याचा एक उत्तम मार्ग सांगणार आहोत.

Updated: Sep 2, 2022, 09:41 AM IST
आता तुमच्या डोक्यावरील केस सांगणार तुमचा स्वभाव; Samudra Shastra मध्ये दडलंय रहस्य title=

मुंबई : जगातील सर्व लोकांचा स्वभाव वेगवेगळा असल्याचं आढळून येतं. एकाच कुटुंबातील सर्व लोकांची विचारसरणी कधीच सारखी नसते. अशा वेळी दुसऱ्याला पाहून त्याचा स्वभाव कसा असेल हे जाणून घ्यावं लागतं, मग आपण अडचणीत येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला इतरांचा स्वभाव आणि वागणूक जाणून घेण्याचा एक उत्तम मार्ग सांगणार आहोत.

समुद्रशास्त्रात दडलेलं रहस्य

भारतीय तत्त्वज्ञानात ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखा आहेत. त्यातील एक शाखा म्हणजे सामुद्रिक शास्त्र. या शास्त्रात म्हटलंय की, एखाद्या व्यक्तीचा अंगठा पाहून त्याचा स्वभाव, गुण आणि भविष्य जाणून घेता येते. समुद्रशास्त्रानुसार, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचे केस पाहून त्याच्या स्वभावाचा अंदाज लावू शकता.

कुरळे केसांबद्दल 

सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या लोकांचे केस कुरळे असतात ते कामाच्या बाबतीत खूप गंभीर आणि सर्जनशील मानले जातात. असे लोक आपली जबाबदारी पूर्ण समर्पण आणि सचोटीने पार पाडतात. मेहनत ही त्यांची फार खासियत असते आणि त्या जोरावर ते आपला ठसा उमटवतात.

मऊ केस 

ज्योतिषशास्त्रानुसार, मुलायम आणि मऊ केस असलेल्या लोकांमध्ये नेतृत्वगुण असतात. असे लोक त्यांच्या स्वभावाने इतरांवर फार लवकर प्रभाव टाकतात. समुद्र शास्त्रानुसार, असे लोक जीवनात खूप सुख आणि समृद्धी मिळवतात आणि समाजात प्रसिद्धी मिळवतात.

पातळ केस 

सामुद्रिक शास्त्रात असं म्हटलंय की, ज्यांचे केस पातळ असतात ते स्वभावाने दयाळू आणि प्रेमळ असतात. असे लोक स्वभावाने सर्जनशील असतात आणि प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन शोधण्यात त्यांचा विश्वास असतो. 

सरळ केस 

ज्या लोकांचे केस सरळ असतात, ते प्रत्येक गोष्ट अतिशय हुशारीने करतात. त्यांना कोणतेही काम मिळालं की ते त्यातील सर्व पैलूंवर चर्चा करतात. त्यानंतर, सर्वकाही नियोजित झाल्यावर ते काम सुरू करतात. असे लोक कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेण्यास कमी पडत नाहीत.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)