Sankashti Chaturthi 2022: संकष्टी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग! पूजा विधी आणि मुहूर्त जाणून घ्या

संकष्टी चतुर्थीला गणपतीची पूजा आणि उपवास करण्याची प्रथा आहे. 

Updated: Jun 16, 2022, 03:09 PM IST
Sankashti Chaturthi 2022: संकष्टी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग! पूजा विधी आणि मुहूर्त जाणून घ्या title=

Sankashti Chaturthi 2022: संकष्टी चतुर्थीला गणपतीची पूजा आणि उपवास करण्याची प्रथा आहे. या दिवशी उपवास आणि गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली, तर विघ्न दूर होतात, अशी मान्यता आहे. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी 17 जून रोजी येत आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहे. या योगात केलेली पूजा आणि शुभ कार्य अनेक फळ देते. या दिवशी मनोभावे पूजा केल्याने यश, सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतात, असं हिंदू धर्मशास्त्रात सांगण्यात आलंय. या संकष्टी चतुर्थीला पूजा करण्याची शुभ वेळ आणि चंद्रोदयाचा मुहूर्त जाणून घेऊयात.

संकष्टी चतुर्थी जून 2022 मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवार 17 जून रोजी सकाळी 06:10 वाजता सुरू होईल आणि शनिवार, 18 जून रोजी पहाटे 02:59 वाजता समाप्त होईल. दुसरीकडे, 17 जून रोजी सकाळी 09:56 ते 18 जून रोजी पहाटे 05:03 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे. दुसरीकडे, अभिजीत मुहूर्त सकाळी 11:30 ते दुपारी 12:25 पर्यंत असेल. संकष्टी चतुर्थीची पूजा चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय पूर्ण होत नाही. या संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ रात्री 10:29 आहे.

संकष्टी चतुर्थीची पूजा कशी करावी

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर आंघोळ करून संकष्टी चतुर्थीचे व्रत व पूजा करण्याचा संकल्प करावा. त्यानंतर शुभ मुहूर्तावर गणेशाचा अभिषेक करावा. त्यांना चंदन, मोदक, फळे, फुले, वस्त्र, धूप, दीप, गंध, अक्षत, दुर्वा इत्यादी अर्पण कराव्यात. तसेच या दिवशी गणेश चालिसा वाचा आणि संकष्टी चतुर्थीच्या व्रताची कथा ऐका. शेवटी गणेशाची आरती करावी. रात्री चंद्र उगवल्यावर चंद्राला अर्ध्य अर्पण करून उपवास सोडावा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)