Shani-Mangal Yuti: 30 वर्षांनंतर शनी-मंगळाची होणार युती; 'या' राशींवर पैसा बरसण्याची शक्यता

Shani And Mangal Conjunction In Kumbh: 2024 मध्ये शनी आणि मंगळाचा संयोग होणार आहे. हे संयोजन सुमारे 30 वर्षांनी तयार होणार आहे. शनिदेव सध्या कुंभ राशीत असल्याने मंगळ देखील 2024 च्या सुरुवातीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 21, 2023, 07:25 AM IST
Shani-Mangal Yuti: 30 वर्षांनंतर शनी-मंगळाची होणार युती; 'या' राशींवर पैसा बरसण्याची शक्यता title=

Shani And Mangal Conjunction In Kumbh: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट अंतरानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या गोचरमुळे आणि इतर ग्रहांशी संयोग तयार होतो. या सर्व गोष्टींचा मानवी जीवनावर परिणाम होतो. 

2024 मध्ये शनी आणि मंगळाचा संयोग होणार आहे. हे संयोजन सुमारे 30 वर्षांनी तयार होणार आहे. शनिदेव सध्या कुंभ राशीत असल्याने मंगळ देखील 2024 च्या सुरुवातीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत मंगळ आणि शनीच्या युतीचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी आहेत ज्यांचे नशीब या काळात चमकणार आहे. जाणून घेऊया या युतीचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. 

मिथुन रास (Mithun Zodiac)

शनी आणि मंगळाचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. यावेळी तुमचे नशीब बदलू शकते. तुमचं महत्त्वाचं काम पूर्ण होऊ शकणार आहे. तुम्ही काही नवीन काम देखील सुरू करू शकता. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. जे स्पर्धक विद्यार्थी आहेत त्यांना नोकरी मिळू शकते. ज्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांना त्यांच्या प्रयत्नात यश मिळू शकते.  

कुंभ रास (Kumbh Zodiac)

शनी आणि मंगळाची जोडी तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमची कार्यशैलीही सुधारणार आहे. तुमची इच्छा त्याच वर्षी पूर्ण होईल. तुम्ही कोणतीही गुंतवणूक कराल तर तुम्हाला भविष्यात फायदा होईल. जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आगामी काळात चांगला नफा मिळेल. 

वृषभ रास (Taurus Zodiac)

शनी आणि मंगळाचा योग तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकणार आहे. या काळात नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकणार आहे. नोकरदार लोकांसाठी पदोन्नती आणि वेतनवाढीची शक्यता आहे. त्याचबरोबर व्यावसायिकांना व्यवसायात नफा मिळेल आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या वडिलांचे सहकार्य मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)