मुंबई : श्रावण महिना सुरू होणाऱ्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. शिवभक्त या महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. भगवान शंकराला अभिषेक केला जातो, विशेष पूजा केली जाते. यंदा उत्तरेकडील राज्यांमध्ये 14 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे. तर महाराष्ट्रात श्रावण महिना हा 15 दिवसांनी सुरू होतो.
यादरम्यान श्रावणातील प्रत्येक सोमवारी खास उपवास आणि शिवाची पूजा करण्यासोबतच काही गोष्टींचेही ध्यान पाळायचा असतात. या कालावधीमध्ये जर नुकसान झालं तर त्याचा मोठा तोटा होऊ शकतो.
- या महिन्यात नॉनव्हेज खाऊ नये असं सांगितलं जातं. या महिन्यात व्यसानापासून दूर राहा. लसूण आणि कांदा खाऊ नये. या महिन्यात सात्विक भोजन करावं. या महिन्यात मुळा खाऊ नये.
- या महिन्यात दूध पिऊ नये कारण दुग्धाभिषेक शिवालिंगावर करायचा असतो.
- या महिन्यात वाईट विचारांपासून दूर राहा. गुरू किंवा कुटुंबातील लोकांचा अपमान करू नये
- गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवू नका, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना जेवण द्या.
- शरीरावर तेल लावणं अशुभ मानलं जातं. असं केल्यानं आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात
- लग्न झालेल्या महिलांनी हळद कुंकू लावून पुजा करावी आणि थोडं हळद-कुंकू हे आपल्या डोक्यालाही लावावं.