Sex Dream meaning: आपल्या प्रत्येकाला रात्री झोपल्यानंतर काही ना काही स्वप्न पडतात. यापैकी काही स्वप्न चांगली असतात, तर काही स्वप्न पाहताच आपण दचकून उठतो. यामध्ये भीतीदायक स्वप्नांचाही समावेश असतो. स्वप्न शास्त्राप्रमाणे प्रत्येक स्वप्नाचा एक अर्थ असतो. काही स्वप्न तुम्हाला आगामी काळातील तुमची चांगली परिस्थितीत दर्शवतात. तर अनेक स्वप्न आगामी काळातील येणाऱ्या संकटांची लक्षणं दाखवतात. पण स्वप्नात शारीरिक संबंध म्हणजे सेक्स पाहण्याचा नेमका अर्थ काय असतो, याचा तुम्ही कधी विचार केलाय का?
स्वप्न शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये जोडीदाराशी शारीरिक संबंध ठेवताना दिसले तर त्याचे दोन भिन्न अर्थ असू शकतात. याचा एक अर्थ म्हणजे तुमचं नातं खूप चांगलं आहे. याशिवाय आगामी काळात तुमचे वैवाहिक जीवन देखील खूप आनंदी असणार आहे.
स्वप्न शास्त्रानुसार, या स्वप्नाचा दुसरा अर्थ म्हणजे, आपण आपल्या जोडीदारासह शारीरिक आणि मानसिक एकत्र येण्याची इच्छा बाळगता. हे स्वप्न कुटुंबात नवीन सदस्य आणण्याची तुमची इच्छा देखील दर्शवते.
एखाद्यासोबत संबंध ठेवतानाची स्वप्न तुमच्या लैंगिक कल्पनांना सूचित करत नाहीत. मात्र लैंगिक स्वप्नातील गोष्टी तुमची असुरक्षितता आणि वैयक्तिक अडचणी तुमच्यासमोर उघड करतात. जर तुम्ही स्वप्नात तुमच्या माजी प्रेयसी किंवा प्रियकराशी सेक्स करण्याचं स्वप्न पाहत असाल तर याचा अर्थ असा आहे की, या प्रकारचं स्वप्न तुम्हाला संकेत देतं की, ज्यांच्यापासून तुम्ही दूर गेला आहात त्यांच्यापासून दूर जाण्याची तुमची इच्छा नव्हती.
स्वप्न शास्त्रानुसार, कदाचित तुम्हाला अजूनही त्यांच्याबद्दल भावना आहेत. अशा प्रकारचं स्वप्न पाहण्याचा असाही अर्थ आहे की, जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमचं लवकरच लग्न होऊ शकते. त्याचप्रमाणे आगामी काळात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.
जर तुम्ही स्वप्नामध्ये एखाद्याच्या गालावर चुंबन घेत असाल किंवा कोणी तुमच्या गालाचे चुंबन घेत असेल तर ते खूप शुभ संकेत मानले जातात. याचा अर्थ असा आहे की, ज्या व्यक्तीने तुम्हाला गालावर किस केलंय त्या व्यक्तीवर तुम्ही खूप प्रेम करता.
स्वप्नात एखाद्याच्या गालाचं चुंबन घेणं हे त्या व्यक्तीशी मैत्री, आदर आणि चांगले वर्तन दर्शवतं. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमचे तुमच्या जोडीदारासोबतचे नातं अधिक चांगले होणार असल्याचे देखील हे संकेत असतात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )