what not to buy on saturday: एखाद्या व्यक्तीवर शनिची कृपा असेल तर ते चांगले असते. मात्र, शनिची वक्रदृष्टी नेहमी त्रासादयक ठरते. त्यामुळे शनी देवाला ज्या गोष्टी आवडत नाहीत, त्या कधीही करु नका. अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. अनेकदा लोकांना असे वाटते की शनिदेव क्रोधी ग्रह आहे. मात्र, असे नाही. ज्यांचे काम चांगले नसेत अशा लोकांवर शनिदेवाची वक्रदृष्टी होते. त्यामुळे शनिदेवाला काय आवडत नाही, हे तुम्ही जाणून घ्या.
तुम्ही नेहमी चांगल्या कामाला प्राधान्य दिले तर ते शनिदेवाला आवडते. असे चांगले काम करणाऱ्या लोकांवर शनीची कृपा राहते. कधी कधी शनिदेव क्रोधित होतो आणि वाईट कर्म करणाऱ्यांना शिक्षा देतो. यामुळेच लोक त्याला क्रोधित ग्रह मानतात आणि त्याला न्यायदेवता किंवा दंडाधिकारी म्हणून म्हटले जाते. प्रत्येकावर शनिदेवाची कृपा राहण्यासाठी आणि शनीदेव प्रसन्न राहण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे. अनेकांना नेहमी वाटते की, कोणते प्रयत्न केले की शनीदेव प्रसन्न होतील. अनेकदा लोकांना शनिदेवाला काय आवडते आणि काय आवडत नाही हेच कळत नाही. या कारणामुळे नकळत अनेकदा शनिदेवाची वक्रदृष्टी राहते.
शनीदेवाला अनेक गोष्टी खटतात. त्यामुळे शनिवारी लोखंडापासून बनवलेल्या वस्तू घरी आणू नका. असे करणे शनिदेव महाराजांना अजिबात आवडत नाही. शनिवारी मीठ खरेदी करणे टाळा. असे केल्याने कर्ज वाढते आणि आर्थिक स्थिती कमकुवत होते.
शनिवारी कात्री खरेदी करु नका किंवा कोणालाही भेट देऊ नका. असे केल्याने वाद-विवाद उद्धभण्याची परिस्थिती निर्माण होते. काही लोक पाय खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांवरही शनिदेवाचा कोप होतो. त्याचवेळी, स्वयंपाकघरात अन्न खाल्ल्यानंतर खरकटी भांडी ठेवू नयेत. हे करणे शनिदेवाला आवडत नाही.
आपल्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा सन्मान केला पाहिजे, अशी शिकवण आपल्या घरात मिळते. त्याप्रमाणे ज्येष्ठ लोकांचा नेहमी आदर केला पाहिजे. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. दुसरीकडे, जे ज्येष्ठ नागरिचा आदर करत नाहीत, त्यांना शनीच्या वक्रदृष्टीला सामोरे जावे लागते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)