Shani Gochar: 30 वर्षानंतर कुंभ राशीत येणार शनिदेव, या तीन राशींना मिळणार दिलासा

Shani Gochar 2023: शनि हा सर्वात मंद गतीने राशी भ्रमण करणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तर राशीचक्र पूर्ण करण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी घेतो. आता 30 वर्षानंतर शनिदेव कुंभ राशीत प्रवेश (Shani Gochar) करणार आहेत. 

Updated: Nov 14, 2022, 06:41 PM IST
Shani Gochar: 30 वर्षानंतर कुंभ राशीत येणार शनिदेव, या तीन राशींना मिळणार दिलासा title=

Shani Gochar 2023: शनि हा सर्वात मंद गतीने राशी भ्रमण करणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तर राशीचक्र पूर्ण करण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी घेतो. आता 30 वर्षानंतर शनिदेव कुंभ राशीत प्रवेश (Shani Gochar) करणार आहेत. 17 जानेवारी 2023 रोजी शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव 30 वर्षानंतर आपल्या स्वराशीत प्रवेश करणार आहेत. 17 जानेवारी 2023 रोजी रात्री 8 वाजून 2 मिनिटांना मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरानंतर काही राशींना साडेसाती आणि अडीचकी सुरु होणार आहे. त्यामुळे काही राशींना शुभ, तर राशींना अशुभ परिणाम जाणवणार आहेत. 

शनिच्या गोचरानंतर मिथुन आणि तूळ राशीची अडीचकी संपेल. तर धनु राशीची लोकांची साडेसातीपासून सुटका होईल. त्यामुळे तीन राशींच्या अडचणी कमी होणार आहेत. मीन राशीला साडेसातीचं पहिलं चरण, कुंभ राशीला मधल्या अडीच वर्षाचं चरण आणि मकर राशीला शेवटचं चरण सुरु होणार आहे. त्याचबरोब कर्क आणि वृश्चिक राशीला अडीचकी सुरु होणार आहे. 

Budh Gochar 2022: 3 डिसेंबरपर्यंत चार राशींसाठी चांगले दिवस! नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचा योग

शनि प्रभाव दूर करण्यासाठी उपाय

शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय दिले आहेत. शनिवारी गरीबांना अन्नदान केलं पाहीजे. त्याबरोबर शनि मंदिरात तेल दान करावं. तसेच ओम हं हनुमते नम: मंत्राचा जप करावा. पितृदोष दूर करण्यासाठी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करावं.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)