Shani Gochar 2022: 12 जुलैला शनिदेव करणार मकर राशीत प्रवेश, 'या' राशींची अडीचकीपासून होणार मुक्ती

शनि, राहु आणि केतु या ग्रहांच्या गोचर म्हटलं की, भल्याभल्यांना घाम फुटतो. शनि आपल्या राशीला नको, असं प्रत्येकाला वाटत असतं.

Updated: Jul 3, 2022, 02:58 PM IST
Shani Gochar 2022: 12 जुलैला शनिदेव करणार मकर राशीत प्रवेश, 'या' राशींची अडीचकीपासून होणार मुक्ती title=

Shani Gochar 2022: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचराला विशेष महत्त्व आहे. त्यात शनि, राहु आणि केतु या ग्रहांच्या गोचर म्हटलं की, भल्याभल्यांना घाम फुटतो. शनि आपल्या राशीला नको, असं प्रत्येकाला वाटत असतं. कारण शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. शनिदेव राशीला आले की काळ कठीण असतो, असं म्हटलं जातं. आता शनिदेव 12 जुलै 2022 रोजी राशी बदल करणार आहेत. शनिदेव वक्री अवस्थेत मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींची अडीचकी आणि साडेसातीपासून मुक्तता होणार आहे. जाणून घेऊयात या राशी कोणत्या आहेत.

'या' राशींची अडीचकीपासून मुक्तता होणार

पंचांगानुसार 29 एप्रिल रोजी शनिदेवांनी स्वराशी कुंभ राशीत प्रवेश केला आहे. या गोचरानंतर मिथुन आणि तूळ राशीची शनि अडीचकीपासून मुक्तता झाली होती. तर कर्क आणि वृश्चिक राशी शनिच्या फेऱ्यात आल्या होत्या. मात्र आता 12 जुलैला शनि मकर राशीत वक्री होणार असल्याने या राशींची शनि अडीचकीपासून मुक्तता होईल. यामुळे कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांची अडकलेली कामं पूर्ण होतील. तसेच विस्कटलेली आर्थिक घडीही व्यवस्थित होईल. 

मनुष्याला आयुष्यात तीन वेळा साडेसातीचा प्रभाव सहन करावा लागतो. तर अडीचकी ही अडीच वर्षांसाठी असते. या काळात शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. शनिदेवांना न्यायदेवता संबोधलं जातं. त्यामुळे शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार फळं देतात. यामुळे साडेसाती आणि अडीचकीच्या काळात गरीब, कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नये. अन्यथा शनिदेव नाराज होतात. शनिच्या दुसऱ्या साडेसातीच्या काळात आई-वडिलांना त्रास होतो. तर तिसऱ्या साडेसातीत पाय आणि गुडघ्यांचा त्रास जाणवतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. याची पुष्टी ZEE 24 TAAS करत नाही.)