Shani Uday 2023 : शनि कुंभ राशीत! पण, फायदा मात्र 'या' राशींना; मिळणार नवी नोकरी आणि पैसा

Shani Uday 2023 Effects : कुंभ राशीत सूर्य आणि बुध आधीपासून घर करुन आहेत. अशातच शनिही कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे शनीच्या उदय हा काही राशींचं भाग्य चमकवणार आहे. तुमच्या राशीवर शनी उदयचा काय परिणाम होणार जाणून घ्या.

Updated: Mar 7, 2023, 07:02 AM IST
Shani Uday 2023 : शनि कुंभ राशीत! पण, फायदा मात्र 'या' राशींना; मिळणार नवी नोकरी आणि पैसा title=
Shani Uday 2023 Effects these Zodiac Signs get money in marathi

Shani Uday 2023 Effects Zodiac Signs in marathi : कुंभ राशीत सूर्य, बुध आणि शनिचा त्रियोग (shani planet) जुळून आला आहे. कुंभ राशीत सूर्य आणि बुध हे आधीपासून विराजमान होते. आता त्यात शनिचा उदय झाला आहे. 30 वर्षांनंतरच शनी हा मूळ त्रिकोण राशीत आला आहे. शास्त्रानुसार शनि (march shani uday) तुमच्या कर्माचीच फळ तुम्हाला देतो. त्यामुळे शनिच्या उदय हा खूप महत्त्वपूर्ण (Shani Uday 2023 horoscope) आहे. याचा परिणाम अनेक राशींवर दिसून येणार आहे. काही राशींसाठी तर हा भाग्यशाली ठरणार आहे.(Shani Uday 2023 Effects these Zodiac Signs get money in marathi) 

'या' राशींचं भाग्य चमकणार 

वृषभ (Taurus)

या राशीसाठी शनिचा उदय खूप भाग्यशाली ठरणार आहे. याचा जीवनात धनलाभ होणार आहे. व्यापारीवर्गातील लोकांना गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होणार आहे. 

कर्क (Cancer)

शनिच्या उदय या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहे. नवीन नोकरी आणि व्यावसायमध्ये सुवर्ण संधी मिळणार आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे मेहनत करा आणि लाभ मिळवा. 

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांना अचानक अनेक फायदे होणार आहेत. पैसे कमविण्याचे अनेक मार्ग त्यांचाकडे चालून येणार आहे. अनेक क्षेत्रात धनलाभ होणार आहे. मात्र उगचीच खर्च करु नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. 

कन्या (Virgo)

शनिच्या उदयामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. उद्योगपतींना अचानक पैसा मिळणार आहे. कुटुंबात आंनदाचे वातावरण असणार आहे. अनेक लोकांच्या भेटीगाठी होणार. या भेटीगाठीचा भविष्यात मोठा फायदा होणार आहे. 

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांच्या कामावर ऑफिसमध्ये वरिष्ठ आणि बॉस खूष होणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर ती संधी तुम्हाला मिळणार आहे. परदेशात जाण्याचे योग आहेत. 
 

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांसाठी शनि उदय फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक समस्या दूर होणार आहेत. नवीन नवीन पैसे कमविण्याचे मार्ग दिसणार आहेत. तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. पण आरोग्य जपा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)