Shukra ki Mahadash : तुमच्या नशीबात राजयोग? संपत्ती आणि ऐशोआराम देणारी शुक्राची महादशा राहते 20 वर्षे

Shukra ki mahadasha : आज शुक्र गोचर होणार आहे. अशातच ज्योतिष शास्त्रानुसार शुक्राची महादशा ही 20 वर्षे टिकते. धन आणि ऐशोआराम देणारा शुक्र हा ग्रह कुंडलीत शुभ स्थितीत असेल तर शुक्राची महादशा त्या राशीच्या लोकांना राजयोग घेऊ येतो.   

Updated: Feb 15, 2023, 11:07 AM IST
Shukra ki Mahadash : तुमच्या नशीबात राजयोग? संपत्ती आणि ऐशोआराम देणारी शुक्राची महादशा राहते 20 वर्षे title=
Shukra ki mahadasha Venus Mahadasha Effects and Remedies upay 20 years wealth luxury and life like king Mukesh Ambani and Gautam Adani

Shukra ki mahadasha : सर्वसामान्य माणसांना कायम वाटतं आपण पण मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासारखे श्रीमंत व्हावं. कसा चमत्कार झाला पाहिजे की एका रात्रीत पैशांचा पाऊस झाला पाहिजे. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र हा धन आणि ऐशोआराम देणारा ग्रह आहे. जर कुंडलीत शुक्र ग्रह चांगल्या स्थितीत असेल तर तो व्यक्तीला अपार संपत्ती, विलास, प्रेम, आनंद आणि आकर्षण प्रदान करतो. शुक्र हा संपत्ती आणि समृद्धी देणारा ग्रह आहे. कुंडलीत शुक्र अशुभ किंवा कमजोर असेल तर व्यक्ती दारिद्र्यात जीवन जातो. त्याच्या आयुष्यात प्रेम आणि वैवाहिक सुखाचा अभाव आहे. म्हणूनच शुक्राचं उच्च स्थानावर असणं आवश्यक आहे. शुक्राची महादशा 20 वर्षे टिकते आणि ज्यांच्यासाठी ती शुभ असतं त्यांना जगातील सर्व सुख देते. त्यामुळे तुमच्या कुंडलीत शुक्राची दशा कुठली आहे ती जाणून घ्या. (Shukra ki mahadasha Venus Mahadasha Effects and Remedies upay 20 years wealth luxury and life like king Mukesh Ambani and Gautam Adani)

शुक्राच्या महादशाचा काय परिणाम होतो? 

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी शुक्राच्या महादशेला सामोरं जावं लागतं. शुक्र शुभ असेल तर व्यक्तीच्या जीवनात उत्तम फळ देते. त्याला सर्व भौतिक सुखं मिळतात. तो एका राजासारखा जीनव जगतो. तर तुमच्या कुंडलीत शुक्राची निम्न स्थिती असेल तर व्यक्तीला शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक समस्यांना सामोरं जावं लागतं. शुक्राची कमकुवत स्थिती त्याला सर्व भौतिक सुखांपासून वंचित ठेवते. त्याच वेळी, यामुळे महिलांच्या जीवनात गर्भपात होतो. किडनी किंवा डोळ्याशी संबंधित आजार होतात. जर तुमच्या कुंडलीतील शुक्राची स्थिती ही निम्न असेल तर शास्त्रात काही उपाय पण सांगण्यात आले आहेत. 

शुक्र महादशातील दोष दूर करण्याचे उपाय

  •  दररोज किमान 108 वेळा शुं शुक्राय नम: या शुं शुक्राय नम: या मंत्राचा जप करा. 
  •  गरजू ब्राह्मणाला दूध, दही, तूप, कापूर, पांढरी फुले किंवा मोती दान करा.
  • दर शुक्रवारी व्रत ठेवा. लक्ष्मीची पूजा करा, तिला खीर अर्पण करा. असं केल्यानं माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि भरपूर संपत्ती देते. 
  • दर शुक्रवारी पीठ आणि साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घाला. यामुळे शुक्र दोषही दूर होतो आणि जीवनात सुख-समृद्धी वाढते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)