Sita Ashtami 2023 : प्रेमवीरांसाठी आजचा दिवस खास कारण आज आहे व्हँलेंटाइन डे (Valentine's Day 2023) ...पण त्यासोबत आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी आहे. आज जानकी म्हणजे सीता अष्टमी आहे. असं म्हणतात की आजच्या दिवशी सीता मातेचा पृथ्वीवर जन्म झाला किंवा पृथ्वीवर अवतरली. हा दिवस सीता अष्टमी किंवा जानकी जयंती म्हणून साजरा केला जातो. आज श्री राम आणि माता सीता यांची पूजा केली जाते. (Sita Ashtami 2023 janki jayanti 2023 Date poojan vidhi shubh muhurt Valentines Day 2023 sita ashtami remedies upay in marathi)
फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 13 फेब्रुवारीला सकाळी 8:15 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 14 फेब्रुवारीला सकाळी 7:40 वाजता समाप्त होईल. हिंदू शास्त्रानुसार 14 फेब्रुवारीला म्हणजे आज सीता अष्टमीचा उपवास आणि पूजा करायची आहे.
आजच्या दिवशी व्रत केल्याने माणसाला सौभाग्य, सुख आणि संतती प्राप्त होते. कुटुंबात समृद्धी राहते.
रामायणात सांगितली आहे की एकदा राजा जनक शेतात जमीन नांगरत होते. त्यावेळी त्यांना पृथ्वीवरून सोन्याच्या भांड्यात चिखलात गुंडाळलेली एक सुंदर मुलगी दिसली. राजा जनकाला त्यावेळी मूल नव्हतं. म्हणूनच राजा जनकने त्या मुलीला दत्तक घेऊन तिचं नाव सीता ठेवलं आणि आयुष्यभर तिला आपली मुलगी म्हणून पालनपोषण केलं. म्हणून सीता माता जनकाच्या कन्येला जानकी म्हणतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)