मेष : व्यापाऱ्यांसाठी काळ ठिक नाही आहे. कोणालाही पैसे उधार देण्यापासून लांब राहा. कोणते तरी जुने उधार देणे तुम्हाला त्रास देऊ शकते. नोकरदार वर्गाने संभाळून राहावं. ऑफिसमध्ये त्रास होण्याची शक्यता आहे. कोणत्यातरी वादात पडू शकता. मानसिक ताण वाढेल. जोडीदाराच्या काहीतरी बोलण्याने मूड खराब होईल. खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या.
वृषभ : ठरवलेली कामे पूर्ण होतील. अचानक धन लाभ होईल. तुमच्या विचार करण्यामध्ये सकारात्ककता येईल. मुलांकडून मदत मिळेल. तुमचे प्लानिंग मेहनतीने पूर्ण कराल आणि त्याचा फायदाही तुम्हाला मिळेल. मित्र आणि भावांकडून सहकार्य मिळेल. जोडीदाराकडू प्रेम आणि सहकार्य मिळेल.
मिथुन : व्यवसायात अचानक धन लाभ होण्याचा योग आहे. जोडीदाराची मदत मिळेल. जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरु शकतो. तुम्हाला अचानक धन लाभ होऊ शकतो. अडकलेला पैसा परत मिळेल. तुम्हाला काही चांगल्या संधी मिळू शकतात. चांगले आणि गोड बोलून तुम्ही आपली कामे करुन घ्याल. आरोग्याच्या तक्रारी येतील. खाण्यापिण्याची काळजी घ्या.
कर्क : कामाच्या ठिकाणी तुमच्या मनासारखे न झाल्याने मूड खराब होईल. प्रेम प्रकरणातील भांडणात कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचणार नाहीत. रोजच्या कामांचा त्रास राहिलच. तुमची ती कामे पण पूर्ण नाही होणार ज्यांचे तुम्ही प्लानिंग केले होते. कोणावर अवलंबून राहू नका. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह : तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. आज तुम्ही इतरांनाही प्रभावित कराल. तुमच्या विचार करण्याची पद्धत लोकांना आवडेल. तुम्ही दिलेला सल्ला लोकांना फायदेशीर ठरेल. कोणती तरी चांगली बातमी येण्याची वाट पाहाल. प्रेमासाठी दिवस सर्वसामान्य राहील. जोडीदार तुमची भावना समजून घेईल.
कन्या : परिवाराची मदत मिळू शकते. तुम्हाला मानसिक संतुलन मिळेल आणि पारिवारीक आयुष्यात आनंद मिळेल. कामे पूर्ण होतील. करियर आणि गुंतवणूकीसंबंधी नव्या संधी येतील. पैशामुळे पारिवारीक स्थितीकडे तुमचे लक्ष जायला हवे. आरोग्यात सुधार होईल. खूप दिवसांपासून सुरू असलेले आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
तुळ : मेहनतीने तुम्हाला यश मिळेल. तुमच्या ईच्छाही पूर्ण होतील. प्रमोशन मिळण्याची चिन्हे आहेत. कोणत्याही प्रकारची संधी सोडू नका. तुम्ही ज्या कामात हात घालाल, त्यात तुम्हाला मदत मिळेल. लोकांकडून कामं करुन घेण्यात तुम्हाला यश मिळेल. दिवस चांगला जाईल. आरोग्य साधारण राहील.
वृश्चिक : पैशांच्या प्रकरणात नुकसान होईल. कायदेशीर बाबीत तुम्ही गुंतून राहाल. वेळेकडे लक्ष द्या. काही विशेष कामात तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल. अचानक घडलेल्या कोणत्याही घटनेवर तात्काळ निर्णय देऊ नका. आरोग्य साधारण राहील. थोडे दमल्यासारेखे वाटू शकते.
धनु : शेअर बाजारातील गुंतवणूक विचारपूर्वक करा. आज तुम्ही बॉस सोबतच्या संबंधानाप्रती थोडे सावधान राहा. जे लोकं तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला थोडा त्रासही देऊ शकतील. तुम्हाला तुमची बाजू मांडण्याचा वेळ उशीरा मिळेल. कोणते तरी खास काम पूर्ण करण्याची इच्छा होती पण ते न झाल्याने ताण वाटेल. तसं होऊ देऊ नका. आज आपल्याला थोडा धीर धरावा लागेल.
मकर : तुम्हाला नुकसान होऊ शकते. दिखावा आणि औडंबर माजवण्यापासून दूरच राहा. परिवारात आर्थिक स्थितीसंदर्भात भांडणे होऊ शकतात. अधिक जबाबदारी मिळू शकते. आज तुम्हाला पैशांच्या प्रकरणात थोड सावधान राहावे लागेल. नाहीतर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला थोडा त्रासही होईल. जोडीदाराच्या वागणूकीमुळे थोडे दु:खी होऊ शकता. आरोग्याच्या दृष्टीने तारे कमजोर आहेत.
कुंभ : करियर संदर्भात कोणती तरी चांगली बातमी मिळू शकते. विरोधक तुमच्यावर प्रभावी होतील. जुनी भांडणे सोडवाल आणि परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. नोकरदार वर्गासाठी वेळ चांगला आहे. तुम्हाला मदत देखील मिळेल. व्यवसायात काहीतरी नवे करण्यामुळे यश मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत संभाळून राहा.
मीन : करियर संदर्भात महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वकच घ्या. विचार करुन गुंतवणूक करा. आज तुम्ही खास काम विसरून जाल. तुमच्या कामात चुका होऊ शकतात. दुसरे देखील त्यांच्या हिश्श्याचे काम तुम्हाला देतील. आज तुम्ही गरजेपेक्षा जास्त थकू शकता. लव लाईफमध्ये उतार चढाव पाहायला मिळतील. आरोग्याकडे लक्ष द्या. छोट्या छोट्या अडचणी वाढतील.