आजचे राशिभविष्य | मंगळवार | १ जानेवारी २०१९

जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल.

Updated: Jan 1, 2019, 08:10 AM IST
आजचे राशिभविष्य | मंगळवार | १ जानेवारी २०१९ title=

मेष- आर्थिक परिस्थिती सुधारेल. वरिष्ठांच्या मदतीने ताटकळलेली कामं मार्गी लागतील. साथीदाराची वागणूक चांगली असेल. शुभ समाचार मिळण्याचे संकेत. आजचा दिवस शुभ. कर्जातून मोकळे व्हाल. आज सारंकाही तुमच्या मनानुसार होणार. अडकलेले पैसे परत मिळतील. पोटाच्या व्याधी होण्याची शक्यता. 

वृषभ- वायफळ खर्च वाढेल. विचार न करता पैसे कुठेही गुंतवू नका. इतरांच्या व्यवहारात डोकावू नका. मिळकत कमी असून, खर्च जास्त असेल. प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगा. काही बाबतीत द्विधा मनस्थिती होण्याची शक्यता.  उत्साहाच्या भरात अशी काही वचनं द्याल की ती पूर्ण करता करता नाकी नऊ येतील. जेवणाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. 

मिथुन- नोकरीमध्ये प्रगती आणि बदलीची शक्यता. नव्या लोकांशी मैत्री होणार. दिवस चांगला जाऊन कामात रुळाल. यश मिळेल. उत्साहात काम करा, चांगली बातमी मिळे. महत्त्वाच्या कामानिमित्त परदेश दौरा संभाव्य. तब्येत चांगली असेल. 

कर्क- कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. नवीन कामं सुरु करण्याचा निर्धार कराल. साथीदाराच्या मदतीमुळेआनंद मिळेल. नव्या संधी तुमची वाट पाहात आहेत. लग्नाविषयीचे निर्णय समोर येतील. नशिब तुमच्या साथीने आहे. मन प्रसन्न राहील. नव्या योजनांचा फायदा होईल. 

सिंह- कामाचा व्याप वाढेल. अडकलेले पैसे परत मिळतील. कामाच्याच निमित्ताने परदेश दौऱ्याची शक्यता. नशिबासोबतच कुटुंबाचीही साथ लाभेल. अपूर्ण कामं मार्गी लावा. काही महत्त्वाच्या कामांमध्ये वेळ जाऊ शकतो. कनिष्ठांची मदत होईल. प्रेमाच्या बाबतीत भावनांना प्राधान्य द्या वादांना नको. तिखट कमी खा. 

कन्या- कामाच्या ठिकाणी मेहनत करावी लागणार. मोठ्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकाल. नशिबाच्या जोरावर कोणता महत्त्वाचा निर्णय घेणार असाल, तर सांभाळून. कोणताही निर्णय नीट विचार करुनच घ्या. इतरांशी बोलताना स्वत:ला आवर घाला. तब्येतीची काळजी घ्या. पाठीचं दुखणं उदभवू शकतं. 

तूळ- चांगली बातमी मिळू शकते. जास्तीचं काम समोर येईल. साथीदाराकडून प्रेम आणि मदत मिळेल. तुमच्या आणि साथीदाराच्या करिअरमध्ये काही महत्त्वाचे बदल होतील. अडचणी कमी होतील. तुमच्याकडे इकरांचं लक्ष असेल. 

वृश्चिक- काम आणि व्यवसायाच्या बाबतीत काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी मन रुळण्यास अडचणी. नशीब आणि मित्रांची साथ लाभेल. सुखाच्या बाबतीत थोडं सावरतं घ्या. अमुक एका गोष्टीची उगाचच भीती वाटत राहील. कोणाशी वाद घालू नका. व्यवसायाच्या बाबतीत कोणताच धोका पत्करु नका. कामाच्या ठिकाणी मतभेद होऊ शकतात. वातावरणातीब बदलामुळे येणाऱ्या आजारपणापासून जपा. 

धनू- कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी. अडकलेली कामं मार्गी लागणार. कामाच्या ठिकाणी नवे बेत आखण्यात यशस्वी व्हाल. कर्ज घेण्याच्या प्रयत्नात असाल तर त्यातही यशस्वी व्हाल. नात्यांविषयी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एकदा सखोल  विचार कराच. तब्येत चांगली राहील. थकवा दूर होईल. 

मकर - विचारपूर्वक गुंतवणूक करा. धोक्याचे निर्णय घेण्यासाठी ही वेळ चांगली नाही. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी संघर्ष करावा लागणार. नोकरी आणि परिस्थितीविषयी विचार करावा लागणार. गुंतवणूक करण्यासाठी चांगला काळ नाही. पैसे अडकण्याची शक्यता. कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीत चढ उतारांची शक्यता. स्वत:च्या तब्येतीचीही काळजी घ्या. 

कुंभ- कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाची कामं पूर्ण होतील. अडकलेली कामंही पूर्ण होतील. जास्तीत जास्त लक्ष कौटुंबीक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकडे द्या. नवं काम सुरू करण्याच इच्छुक असाल तर करु शकता. वाद, तंटे संपण्याची चिन्हं. कोणताही संकेत मिळाला तर नवा व्यवसाय सुरू करा. 

मीन- कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून दाद मिळेल. धनलाभाची शक्यता. व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी बढतीची शक्यता. नक्षत्र आणि नशीबाची साथ लाभेल. विचारांमध्ये नावीन्य असेल. दैनंदिन कामं अटोपण्याकडे तुमचं जास्त लक्ष असेल. तब्येतीकडे मात्र लक्ष द्या.