close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | शनिवार | १५ जून २०१९

तुमचा आजचा दिवस कसा जाईल.

Updated: Jun 15, 2019, 09:50 AM IST
आजचे राशीभविष्य | शनिवार | १५ जून २०१९

मेष- नोकरीत बढतीचा योग संभवतो, मात्र आर्थिक आवक घटण्याचीही शक्यता. प्रपोज करण्यासाठी चांगला दिवस. जुनी दुखणी त्रास देतील. 

वृषभ- गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. आज कामात मन लागणार नाही. शनी आणि चंद्राच्या युतीमुळे पैसे वाचतील. मात्र, घाईघाईत निर्णय घेतल्यास नुकसान संभवते. 

मिथुन- आर्थिक देवाणघेवाणीचे निर्णय काळजीपूर्वक घ्या. ऑफिसमध्ये जास्त मेहनत करावी लागेल. खाण्यापिण्याची काळजी घ्या. नुकसान होण्याची शक्यता. 

कर्क- अपेक्षित कामे मार्गी न लागल्याने नाराज व्हाल. आर्थिक नुकसान होण्याचा योग. धावपळ आणि तणावाचा दिवस. कुटुंबातील व्यक्तीची तब्येत बिघडू शकते. 

सिंह- कामकाज आणि व्यवहारांमध्ये यश मिळेल. ऑफिसमध्ये जास्त मेहनत करावी लागेल. मात्र, अपेक्षित दान पदरात पडल्याने मन प्रसन्न राहील. वैवाहिक जीवनात आनंदाची बातमी मिळेल. 

कन्या- नोकरी आणि व्यवसायात जास्त मेहनत करावी लागेल. जुन्या चिंता मिटतील. जोडीदारासोबत फिरायला जाल. 

तूळ- गुंतवणुकीचे निर्णय सावधानेतेने घ्या. नोकरीच्या ठिकाणी कामात टाळाटाळ करू नका. स्वत:च्या प्रगतीसाठी मेहनत करा. लोकांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी व्हाल.

वृश्चिक- व्यवसायाच्या ठिकाणी तणाव निर्माण होण्याची शक्यता. तब्येतीची काळजी घ्या. जुनी दुखणी सतावतील. एखादी अशुभ बातमी कानावर पडण्याची शक्यता. 

धनु- जमीनजुमल्याच्या व्यवहारांमध्ये फायदा होण्याची शक्यता. प्रेमीयुगुलांसाठी चांगला दिवस. बाहेर फिरायला जाल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. 

मकर- बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळण्याचा योग. व्यवसायात लाभ मिळेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. तुमच्या कर्तृत्त्वाने विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर द्याल. 

कुंभ- नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्याचा योग. सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. एखाद्या नव्या कामाला प्रारंभ करण्यासाठी अनुकुल दिवस. जोडीदाराच्या सल्ल्याचा फायदा होऊ शकतो. 

मीन- व्यवसायात एखादा मोठा निर्णय घेणे टाळा. नुकसानीचा योग संभवतो. भूतकाळात झालेल्या चुकीची चिंता सतावेल. खर्च वाढेल, नियोजन बिघडण्याची शक्यता.