राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी दिवस लाभदायी

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिलस   

Updated: Sep 23, 2020, 07:55 AM IST
राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी दिवस लाभदायी
संग्रहित छायाचित्र

मेष- कामकाजासोबतच जबाबदारी वाढेल. दिवसभर व्यग्र असाल. व्यापारात बहुतांश बाबतीत यशस्वी ठराल. अडचणींवर मात करण्याचे बेत आखाल. 

वृषभ- जुन्या अडचणी दूर होतील. सक्रियता वाढलेली असेल. समाज आणि कुटुंबासाठी आखलेली अनेक कामं पूर्ण होतील. दिवसभर अनेक विचार मनात घर करतील. खर्च आणि अर्थार्जनाच योग्य ते समतोल साधाल. 

मिथुन- धनलाभ होण्याची शक्यता आहे. अशा एखाद्या कामाचा फायदा होईल, जे भविष्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं असेल. आज तुम्ही स्वत:ला सिद्ध करु शकाल. बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी समोरून येतील. त्यामुळं आजचा दिवस आशादायी आहे. 

कर्क- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तरीपण सतर्क राहा. आर्थिक बाबतीत लक्ष द्या. वाद मिटतीलय आप्तेष्ठांशी असणाऱे संबंध आणखी दृढ होतील. सहशीलता वाढेल. 

सिंह- आर्थिक स्तर उंचावलेला असेल. महत्त्वाकांक्षाही वाढलेली असेल. वरिष्ठांवर तुमच्या कामाचा प्रभाव पडेल. मेहनत आणि समजुतदारपणाचा फायदा होईल. एखादी अडचण दूर होईल. 

कन्या- नोकरीच्या ठिकाणी एखादी नवी सुरुवात करण्याची संधी मिळएल. कामावर लक्ष द्या. जुनी कामं संपवण्याचा विचार करा. कौटुंबीक समस्यांवर तोडगा काढण्याचा विचार कराल. 

तुळ- विचाराधीन कामं पूर्ण होतील. कौटुंबीक जबाबदारी मिळेल. जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्याचा विचार कराल. नोकरी आणि व्यवसायात मोठा फायदा होणार आहे. 

वृश्चिक- आजचा दिवस लाभदायी आहे. कठीण परिस्थितीवर मात कराल. नवे करार अतिशय फायद्याचे ठरणार आहेत. आजारपणा दूर होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. 

धनु- नोकरी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत दिवस चांगला आहे. नव्या नोकरीच्या ठिकाणी बढतीची संधी आहे. उत्सुकता परमोच्च शिखरावर असेल. इतरांची मदत करण्यासाठी पुढाकार घ्याल. 

मकर- महत्त्वाची कामं पूर्ण होतील. या कामांचा येत्या काळात मोठा फायदा होणार आहे. मेहनत करा. फळ मिळेल. नवी कामं सुरु करण्याऐवजी जुनी कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. 

 

कुंभ- आज धैर्यानं पुढे जा. दिवसभर पैशांचाच विचार करत असाल. जमिनीच्या व्यवहारांमध्ये धनलाभ होण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामांचा व्याप वाढलेला असेल. वेळ द्या. सर्वकाही सुरळीत होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचा विचार कराल. आरोग्याची चिंता कमी होईल. 

मीन- आजचा दिवस लाभदायी आहे. आरोग्याची चिंता मिटेल. अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळतील. इतरांचीही काळजी घ्या. आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडेल.