राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी खास दिवस, होणार मोठा फायदा

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस   

Updated: Sep 22, 2020, 07:26 AM IST
राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी खास दिवस, होणार मोठा फायदा
संग्रहित छायाचित्र

मेष- कोणा एका निर्णयाच्या प्रतिक्षेत आहात, तर शांतता राखा. सर्वकाही सुरळीत होईल. दैनंदिन कामांतून वेळ काढत काही नव्या संकल्पना अंमलात आणाल. मेहनत करा, फळ मिळेल. कुटुंबाला वेळ द्या. 

वृषभ- तुमच्या मतांचा इतरांवर प्रभाव पडणार आहे. तुमच्याहून कनिष्ठ मंडळींबाबतच सतत विचार कराल, त्यांच्या हिताचा विचार कराल. हा स्वभाव तुम्हाला फायद्याचा ठरेल. कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल.

मिथुन- दैनंदिन कामं पूर्ण करण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करावे लागतील. जबाबदारीवर लक्ष ठेवा. शांतता राखा. सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. फायदाच होईल. 

कर्क- अर्थार्जनाच्या वाटांमध्ये यशस्वी व्हाल. एखादा नवा रोजगार मिळेल. जास्तीच्या कामामध्ये मित्रांची मदत मिळेल. जुनी आणि अडकलेली कामं मार्गी लावा. इतरांचा दृष्टीकोन विचारात घ्या. 

सिंह- आज कोणतंही काम टाळू नका. नोकरी किंवा व्यापारावर लक्ष द्या. एकाग्रतेनं काम पुढे न्या. कुटुंबासमवेत जास्त वेळ व्यतीत कराल. मन आणि विचारांवर ताबा ठेवा. कुटुंबाच्या मदतीनं आर्थिक अडचणींवर मात कराल. 

कन्या- आजचा दिवस खास आहे. तुम्हाला आज अनेकांची मदत मिळणार आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी दिवस योग्य आहे. मानसिक संतुलन राखा. 

तुळ- परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न कराल. चांगल्या वागणुकीचा तुम्हाला फायदा होणार आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. कामात मन रुळेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. 

वृश्चिक- अनेक कामं सहज पद्धतीनं पुर्ण होतील. अडकलेली कामं पूर्ण होतील. कुटुंबातील वाद मिटतील. मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. 

धनु- मागील काही दिवसांपासून ज्या कामांच्या प्रतिक्षेत होतात, ती कामं पूर्ण होतील. नव्या ठिकाणी जाण्याचा योग आहे. परिस्थिती आणि नशिबावर विश्वास ठेवा. 

मकर- बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील. अनेक अडचणी सहज दूर होतील. अनुभवी व्यक्तींचा सल्ला फायद्याचा ठरेल. शारीरिक व्याधी दूर होतील. व्यवसायाचा स्तर उंचावेल. 

 

कुंभ- दिवस सामान्य आहे. वादांपासून दूर राहा. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. जुनी आणि अडकलेली कामं मार्गी लागतील. एखादी शुभवार्ता मिळेल. 

मीन- दैनंदिन कामं वेगानं पूर्ण होतील. जबाबदारीची कामं मिळतील. कामकाज सुधारण्याचा प्रयत्न करा. मानसिक संतुलन राखा आणि निर्णय़ घ्या.