राशीभविष्य : आज 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार नशिबाची साथ

पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Mar 31, 2020, 07:46 AM IST
राशीभविष्य  : आज 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार नशिबाची साथ

मेष- धनलाभ होण्याची शक्यता आहे.  सोप्या पद्धतीने कोणतीही गोष्ट मिळवू शकाल. पण, याचा वाईट पद्धतीने वापर करु नका. तुमची वाट यातूनच मिळणार आहे. 

वृषभ- आज स्वत:लाच प्रेरणा द्या. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या ताब्यात असणाऱ्या गोष्टी आज मात्र दूर जातील. पण, तरीही नशीबाची साथ असणार आहे. आज तुम्हाला फार मेहनत करावी लागणार आहे. 

मिथुन- आज तुमच्यासाठी निर्णय घेणं अतिशय सोपं असणार आहे. विचार स्पष्ट ठेवा. एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर आज योग्य वेळ आहे. कोणाला गरज भासल्यास त्यांची मदत करा. 

कर्क- सर्वबळाने एखाद्या गोष्टीसाठी मेहनत करा. यश तुमचंच आहे. वास्तवात चुकीचे सल्ले घेण्याच्या नादात अडकू नका. 

सिंह- आज तुम्ही खूप विचार करत असाल. पण, त्याविषयी नकारात्मक होण्याची गरज नाही. एखाद्या गोष्टीसाठी अधिक वेळ दवडला जाणार आहे, असं वाटत असल्यास ती संकटं तितक्याच लवकर कमीही होतील हे विसरु नका. 

कन्या- कोणतीही माहिती परतावू नका. इतरांसाठी हे फायद्याचं ठरेल. आज स्वत: निर्णय घेण्याऐवजी इतरांची मदत करा. 

तुळ- लोका. विचार करणं बंद करा आणि या प्रवासाला निघा. मन दुसऱ्या कामांमध्ये गुंतवा. लक्ष्य केंद्रीत ठेवा. 

वृश्चिक- कनिष्ठांकडून बरेच सल्ले मिळतील. विश्वाच्या नव्या प्रवाहाची तुम्हाला माहिती मिळेल. अगदी त्याच प्रवाहासह वाहत जा, फायदा होणार आहे. 

धनू- आज कोणतंही संकट ओढवू नका. पारंपरिकतेवर भर द्या. नव्या गोष्टींसाठी प्रयत्न करा. दिवस चांगला आहे. अनपेक्षितपणे एखाद्या व्यक्तीकडून समर्थन मिळेल. 

मकर- तुमची संचारशक्ती भक्तम असेल. इतरांना समजून घेण्यात तुम्ही कुठेतरी कमी पडाल. आज तुम्ही खुप आनंदात असाल. तुम्हाला जसं हवं आहे, तसंच घडेल. 

कुंभ- आज शत्रूपासून सावध राहा. चिंता कमी करा. तुमचे खरे मित्र काहीच चुकीचं होऊ देणार नाहीत. इतरांना तुमची काळजी आहे. हे दिवसही दूर होतील. चिंता नसावी. 

मीन- आजूबाजूच्या वातावरणामुळे तुम्हाला दिलासा आहे. माहिती मिळवण्यासाठी नवे मार्ग अंमलात आणा. खरेपणाने इतरांना सामोरे जा.