राशीभविष्य १८ जानेवारी : 'या' राशीच्या लोकांना होणार धनलाभ

काय म्हणतेय तुमची रास   

Updated: Jan 18, 2020, 08:25 AM IST
राशीभविष्य १८ जानेवारी : 'या' राशीच्या लोकांना होणार धनलाभ

मेष - अत्यंत मेहनत करण्याची गरज आहे. त्यामुळे जे तुम्ही करू इच्छीता त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. दैनंदिन कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टीला स्वत:च्या स्तरावर सोडवण्याचा प्रयत्न करा. राजकारणाच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्यांना एखादं मोठं पद मिळेल. 

वृषभ - उत्पादनात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी काही गोष्टी करण्यासाठी आडचणी येत असतील तर त्या आज काही प्रमाणात कमी होतील. कोणत्याही गोष्टीची चिंता करु नका. एखादी शुभवार्ता मिळेल. असे काही बेत आखाल ज्याचा येत्या दिवसांमध्ये फायदा होणार आहे. 

मिथुन - आजचा दिवस थोडा खराब असेल. जोडीदाराशी विचारपूर्वक वागा. जोडीदारावर विश्वास ठेवा, संशय घेऊ नका. कामावर लक्षकेंद्रीत करा, चांगला लाभ होईल. 

कर्क- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या योजनेचा फायदा होईल. तुमच्या विचारांचा सन्मान कामाच्या ठिकाणी आणि घरात देखील होईल. कोणतेही निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. आरोग्य सांभाळा.  

सिंह- विचार दृढ ठेवा. आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कामात आजचा दिवस जाईल. त्यामुळे जोडीदाराला वेळ देऊ शकणार नाही. पण संपूर्ण लक्ष कामावर केंद्रीत करा, लाभ होईल. शरिराकडे लक्ष द्या, स्वास्थ बिघडण्याची शक्यता. 

कन्या - प्रेमात असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खास आहे. तुमच्या जोडीदारासोबत आज मतभेत होतील. पण दिवस संपताच सगळं विसरून जाल. कामात लक्ष द्या. 

तूळ - कामात पॅशन ठेवा. कामावर प्रेम करा. कामात यश मिळेल. यामुळे वैवाहिक जीवनही चांगले राहिल. कामाचा ताण कमी झाल्यावर कुटुंबाकडे, जोडीदाराकडे लक्ष द्या. दिवस प्रेमाचा आहे. 

वृश्चिक - लग्नाचा विचार करत असाल तर आजच्या दिवसांत कुणा खास व्यक्तीला भेटा. त्या व्यक्तीमध्ये रुची वाढेल. कामातून आनंद मिळेल. मनासारखं काम केल्याचं समाधान मिळेल. दिवस चांगला जाईल. 

धनू - आजचा दिवस हा उत्साही, रोमांचक आणि आनंदी जाईल. आजच्या दिवसात काम देखील मनासारखं होईल. आणि जोडीदाराला देखील मनासारखा वेळ द्याल. नवीन गोष्ट सुरू करण्याचा विचार करत असाल तर नक्की करा. 

मकर - आजचा दिवस तुमचा आहे. जोडीदाराच्या शोधात असाल तर तो शोध आज संपेल. व्यवसायात किंवा नोकरीत आजचा दिवस थोडा खडतर असेल. पण दिवसाच्या शेवटी कामातून भरपूर आनंद आणि समाधान मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींकडे लक्ष द्याल. 

कुंभ - आज तुम्ही प्रेम आणि दृढ विश्वासावर अवलंबून असाल. पण प्रेमात आज थोडी नाराजी स्विकारावी लागेल. काम मनाप्रमाणे कराल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता अधिक. शरिराकडे लक्ष द्या. आजूबाजूच्या बदलांमुळे त्रास होण्याची शक्यता. 

मीन - आज तुम्ही सल्ले देण्यासाठी उत्सुक असाल. आजचा दिवस अतिशय चांगला आहे. कामातून आनंद मिळेल. त्याचप्रमाणे व्यवसाय करणाऱ्यांसाठी थोडा खडतर दिवस आहे. स्वास्थ चांगल असेल. पण लक्ष द्या.