Surya Gochar 2023: 15 मार्च 2023 रोजी सूर्यदेव मीन राशीत प्रवेश करणार आहे. या राशी परिवर्तनाचा अनेक लोकांच्या जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे, ज्यावेळ ग्रहांचा राजा सूर्य एखाद्या राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी त्याचा नकारात्मक तसंच सकारात्मक प्रभाव व्यक्तींच्या आयुष्यावर दिसून येतो. सूर्य मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे, हे आज आपण जाणून घेऊया.
15 मार्च म्हणजेच बुधवारी सकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य 14 एप्रिल 2023 रोजी दुपारी 3 वाजून 12 मिनिटांपर्यंत या राशीत राहणार आहे. मात्र यानंतर तो मेष राशीत प्रवेश करणार आहे.
मेष (Aries)
सूर्याच्या या राशी परिवर्तनामुळे या राशींच्या वैवाहिक जीवनात मतभेद येण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर यावेळी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. मानसिक तणावाचा देखील तुम्हाला सामना करावा लागू शकतो. जीवनात अशा अनेक अडचणी येतील ज्यांचा सामोरं जावं लागू शकतं.
सिंह (Leo)
सिंह राशीच्या लोकांना सूर्याच्या परिवर्तनाचा संमिश्र परिणाम दिसून येणार आहे. या व्यक्तींनी आरोग्याबाबत बेफिकीर राहू नये. तुमच्या बोलण्यावर तसंच तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. याशिवाय ज्या ठिकाणी तुम्ही काम करता तिथे सहकाऱ्यांशी वाद होतील. याशिवाय कामात अडथळे येऊ शकतात.
कन्या (Virgo)
तुमच्या जोडीदारासोबत मोठा होऊ शकतो. त्याचसोबत जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. भांडणं आणि वादविवादांचा सामना करावा लागेल. या गोचरमुळे तुम्हाला अधिक समस्या निर्माण होऊ शकतात. मुख्य म्हणजे तुमच्याविरुद्ध आखलेले डावपेचांना यश मिळू शकतं.
धनु (Sagittarius)
मीन राशीतील सूर्याच्या परिवर्तनाचा या राशीच्या व्यक्तींना संमिश्र परिणाम मिळणार आहे. घरातील वातावरण अध्यात्माने भरलेलं राहू शकतं. यावेळी तुमच्या आईसोबतच्या नात्यात चढ-उतार येऊ शकतात. वरिष्ठांशी वाद झाल्याने तुमच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)