मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचं इतर राशीत परिवर्तन होत आहे. याचा प्रभाव 12 राशींवर होणार आहे. 15 जून रोजी सूर्य ग्रह मिथुन राशीत प्रवेश करत आहे. त्याचा काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम होणार आहे. तुमच्या राशीवर काय परिणाम होणार जाणून घेऊया.
मेष : या राशीच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे. रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असणार आहे. आपल्या रागामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. या राशीच्या लोकांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
वृषभ : सूर्याचा मिथुन राशीतला प्रवेश या राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरू शकतो. आई-वडिलांची विशेष काळजी घ्या. कुटुंबात तणावाचं वातावरण राहील. कुटुंबातील नात्यांमध्ये तणाव निर्माण होणार नाही यासाठी काळजी घ्या.
धनु : या राशीच्या लोकांना या काळात अनेक समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो, त्यामुळे या काळात स्वतःला वादविवादापासून दूर ठेवा. या दरम्यान, तुमच्या बोलण्यामुळे गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे सावधपणे बोला.
मकर : या राशीच्या लोकांनी सावध राहायला हवं. कामात अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून दूर राहा. कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मीन : वादविवादापासून दूर राहा. ऑफिसमध्ये कामाच्याबाबतीत विशेष काळजी घ्या. सांभाळून राहा आणि सावध राहा.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )