Surya Nakshatra Gochar 2023: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. यामध्ये काही ग्रह त्यांच्या नश्रत्रामध्येही बदल करतात. ग्रहांचा राजा सूर्य काही काळानंतर राशीशिवाय नक्षत्र बदलतो. सूर्याच्या राशीतील बदलाचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावरही कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो.
सूर्य देवाचे 14 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे 03:38 वाजता उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात गोचर करणार आहेत. या नक्षत्राचा स्वामी स्वतः सूर्यदेव आहे. सूर्याच्या उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश केल्याने यावेळी अनेक राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र हे 27 नक्षत्रांच्या यादीतील 12 वं नक्षत्र आहे. यावेळी उत्तरा नक्षत्रामध्ये सूर्यदेवाच्या गोचरमुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा होणार आहे, ते पाहूयात.
सूर्य स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश केल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे. आत्मविश्वास झपाट्याने वाढणार आहे. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणीही तुमचा दिवस खूप चांगला जाणार आहे. तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. गुंतवणूकही फायदेशीर ठरणार आहे. चांगला परतावा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. अनपेक्षित पैसे मिळू शकतात. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.
सूर्याच्या नक्षत्र बदलाचा या राशीच्या लोकांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांना सामाजिक आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकते. तुम्ही शांततेने घेतलेले निर्णय योग्य ठरू शकतात. कामाच्या ठिकाणीही सर्वजण तुमच्या कामाची प्रशंसा करतील. भरपूर पैसा हाती लागणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सर्व गोष्टी मनाजोग्या होणार आहेत.
सूर्याच्या नक्षत्र गोचरमुळे या राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. या काळात सर्वजण तुमची प्रशंसा करतील. तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही अचानक लाभ मिळू शकतो. या राशीच्या व्यक्तींना सर्व भौतिक सुखं मिळू शकणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा अनेक पटींनी वाढेल. अधिकारी पदांवर काम करणाऱ्या लोकांनाही यश मिळू शकते. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )