Vastu Tips: मकर संक्रांतीला घरातील पूर्व दिशेला ठेवा ही छोटीसी वस्तू, आर्थिक चणचण दूर होणार

Makar Sankranti 2023: मकर संक्रांती हा सण यंदा 15 जानेवारी 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात या सणाचं खूप महत्त्व आहे. या दिवसी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत गोचर करतात. या गोचराला मकर संक्रांती असं संबोधलं जातं. हा दिवस खास सूर्यदेवांशी निगडीत आहे.

Updated: Jan 12, 2023, 03:27 PM IST
Vastu Tips: मकर संक्रांतीला घरातील पूर्व दिशेला ठेवा ही छोटीसी वस्तू, आर्थिक चणचण दूर होणार title=

Vastu Things For Makar Sankranti 2023: मकर संक्रांती हा सण यंदा 15 जानेवारी 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात या सणाचं खूप महत्त्व आहे. या दिवसी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत गोचर करतात. या गोचराला मकर संक्रांती असं संबोधलं जातं. हा दिवस खास सूर्यदेवांशी निगडीत आहे. त्यामुळे सूर्यदेवांची पूजा केल्याने इच्छित फळ प्राप्ती होते. ज्योतिषशास्त्रात मकर संक्रांतीला स्नान-दान आणि पूजा करणं शुभ मानलं जातं. पौराणिक कथेनुसार असं सांगितलं जातं की, सूर्यदेव शनिच्या घरी गेले होते, तेव्हा काळे तीळ घेऊन गेले होते. त्यामुळे शनिदेव प्रसन्न झाले होते. त्यामुळे या दिवशी काळ्या तीळाचं महत्त्व सांगितलं आहे. दुसरीकडे, मकर संक्रांतीनिमित्त काही खास वास्तू टिप्स अवलंबू शकता. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि आर्थिक चणचण दूर होऊ शकतो. मकर संक्रांतीला काही वस्तू घरात ठेवल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. 

मकर संक्रांतीला ही वस्तू घरी आणा

वास्तुशास्त्रात मकर संक्रांतीला घरी पितळेचा सूर्य आणावा. यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती लाभते. या दिवशी घराच्या पूर्व दिशेला पितळेचा सूर्य लावा. यामुळे घरात आर्थिक चणचण भासत नाही. पितळेच्या सूर्याच्या खाली घंटी असतात. यामुळे घरात सकारात्मक उर्जा येते. 

बातमी वाचा- Astro: सकाळी बेडवरुन उठल्या उठल्या करा 'या' मंत्राचा जप, संपूर्ण दिवस जाणार मजेत 

अशी कराल मकर संक्रांतीला पूजा

मकर संक्रांतीला भगवान विष्णु आणि सूर्यदेवाची पूजा करणं शुभ मानलं जातं. काही महत्त्वाची कामं अडकली असतील तर या दिवशी पूजा केल्यास फळ मिळतं. तांब्यामध्ये लाल फूट आणि अक्षता टाकून सूर्यदेवांना अर्घ्य द्या. यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात. तसेच सूर्यादेवांचा 108 वेळा जप करा. दुसरीकडे, तीळ, ब्लँकेट आणि अन्नदान विशेष मानलं जातं. तसेच करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी गरजवतांना खिचडी दिल्यास लाभ होतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)