Black Seasme Remedies For money : हिंदू पंचांगाप्रमाणे मकर संक्रांत (Makar Sankrant 2023)पौष महिन्यात येणारा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांत असं म्हंटलं जातं. मकर संक्रांतीला तिळाने सूर्य, विष्णु आणि शनिदेवांची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार, हनुमंत आणि शनिदेव यांच्यात युद्ध झालं होतं. तेव्हा मारुतिरायाने शनिदेवाच्या प्रहारावर प्रहार केले होते. या जखमा शनिदेवांना सहन करणं कठीण झालं. युद्ध शांत झाल्यावर मारुतिरायांनी शनिदेवांना तीळाचं तेल लावण्यास दिलं. यामुळे त्यांच्या वेदना शमल्या. यावेळी शनिदेवांनी सांगितलं की, जो भाविक मला खऱ्या श्रद्धेने तीळ आणि तीळाचे तेल देईल, त्यांच्या इच्छा पूर्ण करेल. शनिदेवांच्या कृपा मिळवण्यासाठी काळ्या तीळाचे उपाय (Kale Til Upay) प्रभावी ठरतात. या कथेप्रमाणे ज्योतिषशास्त्रातही तीळाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. मकर संक्रांतीला तीळ गूळ खाणं, तीळगुळाचं दान करणं आणि पाण्यात तीळ टाकून स्नान करणं शुभ मानंलं जातं. चला जाणून घेऊयात काळ्या तीळाचे तोडगे...
-ज्या लोकांच्या कुंडलीत शनिदोष किंवा शनि साडेसाती-अडीचकी सुरु आहे त्यांनी पौष महिन्यातील शनिवारी वाहत्या पाण्यात काळे तीळ सोडावे. यामुळे शनिदेवाच्या प्रकोपापासून सुटका होते.
-पौष महिन्याच्या शनिवारी काळ्या तीळाच दान केल्याने राहु-केतुच्या अशुभ प्रभावातून दिलासा मिळतो. या व्यतिरिक्त कालसर्फ योग आणि पितृदोषातून मुक्तता होते.
-पौष महिन्यातील प्रत्येक शनिवारी काळे तीळ आणि काळे उडद काळ्या कपड्यात बांधून गरीबाला दान करा. यावेळी काही पैशांचं दानही करा. यामुळे आर्थिक अडचण दूर होते.
-वारंवार आर्थिक अडचण येत असेल तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून पायापर्यंत एक-एक मुठ्ठी काळे ओवाळून घराच्या उत्तर दिशेला फेका. यामुळे आर्थिक चणचण भासत नाही.
बातमी वाचा- Lal Kitab: हळदीच्या तोडगा प्रगतीसाठी प्रभावी! जाणून घ्या लाल किताबमधील प्रयोग
-तुमच्यावर संकटांचा डोंगर उभा राहिला असेल आणि संकटं संपण्याचं नाव घेत नसेल तर ओम नमो वासुदेवाय या मंत्राचा जाप करा. शनिवारी दुधात काळे तीळ टाकून पिंपळाला द्या. यामुळे वाईट काळातून सुटका होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)