Surya-Shukra Yuti 2022: 9 दिवसांनंतर या राशींच्या आयुष्यात येतील 'अच्छे दिन', सूर्य-शुक्र युतीमुळे होईल फायदा

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या कुंडलीत शुक्राच्या शुभ स्थानामुळे भौतिक सुख, वैवाहिक सुख आणि संतती सुख प्राप्त होते.

Updated: Jul 28, 2022, 04:02 PM IST
Surya-Shukra Yuti 2022: 9 दिवसांनंतर या राशींच्या आयुष्यात येतील 'अच्छे दिन', सूर्य-शुक्र युतीमुळे होईल फायदा title=

Surya-Shukra Yuti 2022: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या कुंडलीत शुक्राच्या शुभ स्थानामुळे भौतिक सुख, वैवाहिक सुख आणि संतती सुख प्राप्त होते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या विवाह आणि मुलांशी संबंधित माहितीसाठी कुंडलीत शुक्र ग्रहाची स्थिती पाहिली जाते. जेव्हा कोणताही ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या आर्थिक स्थितीवर, वैवाहिक जीवनावर होतो. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रह 7 ऑगस्ट रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत सूर्य ग्रह आधीच स्थित आहे. शुक्र कर्क राशीत प्रवेश करताच सूर्याशी युती होईल. या युतीचा प्रभाव सर्व राशींच्या जीवनावर दिसून येईल. तीन राशींवर या राशीचा शुभ प्रभाव पडेल.

मेष - ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांच्या मान-सन्मानात वाढ होईल. या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. जीवनसाथीसोबत चांगला वेळ घालवू शकाल. परस्पर वाद दूर होण्याची शक्यता आहे. तसेच काही चांगल्या बातम्या जीवनात बदल घडवून आणतील.

मिथुन - शुक्र आणि सूर्य यांच्या युतीमुळे या राशीच्या लोकांच्या घरातील वातावरण प्रसन्न राहील. संततीप्राप्तीची इच्छा असलेल्या लोकांच्या मनोकामना पूर्ण होतील. लाइफ पार्टनरला वेळ देऊ शकाल आणि तब्येतही चांगली राहील.

कन्या - शुक्र आणि सूर्याच्या युतीने कन्या राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनावर परिणाम दिसून येईल. प्रेम आणि परस्पर समंजसपणा वाढेल. या काळात तुम्हाला एखाद्या आजारापासून मुक्ती मिळेल. ज्योतिष शास्त्रानुसार या काळात जीवन साथीदाराला नोकरीत लाभ मिळू शकतो. 

या राशींसाठी युती ठरणार त्रासदायक!

ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही ग्रहाच्या हालचालीचा सर्व राशींच्या जीवनावर शुभ आणि अशुभ दोन्ही प्रभाव पडतो. त्याचबरोबर तूळ, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा त्रासदायक ठरेल. त्यांचे जोडीदाराशी वाद होऊ शकतात. नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात थोडे सावधपणे वागणे योग्य राहील.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)