Surya Shukra Yuti In Kanya Rashi: सप्टेंबर महिन्यात कन्या राशीत (Kanya Rashi) ग्रहांच्या युती अनोखा मेळ पाहायला मिळत आहे. बुध ग्रह कन्या राशीत वक्री होऊन ठाण मांडून बसला आहे. 10 सप्टेंबरपासू बुध्दी आणि व्यापार आणि वाणीचा कारक ग्रह असलेला बुध ग्रह कन्या राशीत वक्री आहे. गोचर कुंडलीप्रमाणेस सूर्य प्रत्येक महिन्याला राशी बदल करतो. त्यानुसार 17 सप्टेंबरला सूर्य सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. असं असताना लगचेच 7 दिवसांनी म्हणजेच 24 सप्टेंबरला शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे कन्या राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहे.
ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्य आणि शुक्र हे दोन्ही शुभ ग्रह मानले जातात. परंतु दोन्ही ग्रह एखाद्या राशीत एकत्र आल्यास अशुभ परिणाम देतात. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हाही एखादा ग्रह सूर्याजवळ येतो तेव्हा त्या ग्रहाचा प्रभाव कमी होतो, त्यामुळे काही काळासाठी तो प्रभावहीन होतो. या कारणास्तव शुक्र सूर्याच्या युतीमुळे शुक्राचे शुभ परिणाम कमी होतील. शुक्र-सूर्य यांच्या एकत्र येण्याच्या योगाला 'युति योग' म्हणतात. कन्या राशीतील बुध, सूर्य आणि शुक्राच्या त्रिग्रही युतीमुळे काही राशींना फायदा तर काही राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
-मेष : या राशीच्या लोकांसाठी सूर्य-शुक्र ग्रह युतीचे चांगले परिणाम मिळतील. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.
-वृषभ : या राशीच्या लोकांनी या काळात सावध राहण्याची गरज आहे. सूर्य-शुक्र ग्रह युतीचा तुमच्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
-मिथुन : सूर्य-शुक्र युती मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होईल. मिथुन राशीचे लोक भाग्यवान ठरतील. या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
-कर्क : या काळात प्रतिष्ठा वाढू शकते. खूप खास लोकांना भेटणे शक्य आहे, ज्याचा तुम्हाला आगामी काळात फायदा होईल.
-सिंह : सूर्य-शुक्र युती सिंह राशीच्या लोकांच्या भाग्यात वाढ करेल. सरकारी नोकरीसाठी काळ अनुकूल राहील. आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील.
-कन्या : या राशीच्या लोकांना लाभाच्या संधी मिळतील. परदेश प्रवास शक्य आहे, परंतु या राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात.
-तूळ : या राशीच्या लोकांसाठी हा योग संमिश्र साथ देईल. नोकरदार लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल होतील.
-वृश्चिक : या काळ तुमच्यासाठी अडचणीचा ठरेल. शत्रू तुमच्यावर भारी पडतील. केलेली कामे अचानक बिघडू लागतील. धनहानी होण्याची शक्यता आहे.
-धनु : हा या राशीसाठी आनंददायी असेल. संकटाचा काळ संपणार आहे. नोकरीत अपेक्षित लाभ मिळतील. योजना मार्गी लागतील.
-मकर : या काळात वैवाहिक जीवनात अडचणी येतील. वाद निर्माण होऊ शकतात. धनहानी होण्याची चिन्हे आहेत.
-कुंभ : या युतीचा तुम्हाला फायदा होईल. कामात प्रगती होईल. कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळेल. व्यवसायात चांगले करार निश्चित होऊ शकतात.
-मीन: रवि-शुक्र युतीमुळे अपेक्षित लाभ मिळेल. तुम्हाला लाभाच्या अनेक संधी मिळतील.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)