Swapna Shastra: स्वतःचच लग्न झाल्याचं स्वप्न पाहणं शुभ की अशुभ?

आपल्याला रात्री पडत असलेल्या स्वप्नांचा अर्थ स्वप्नशास्त्रात सविस्तरपणे सांगितला आहे. 

Updated: Sep 28, 2022, 10:13 AM IST
Swapna Shastra: स्वतःचच लग्न झाल्याचं स्वप्न पाहणं शुभ की अशुभ?  title=

मुंबई : रात्री झोपताना स्वप्नं पडणं सामान्य गोष्ट आहे. या स्वप्नांमध्ये, आपण कधीकधी विचित्र गोष्टी घडताना पाहतो. यामधील काही स्वप्नं आपल्याला आनंद देतात तर काही स्वप्नं आपल्याला घाबरवतात. झोपेतून उठल्यानंतर आपण त्या स्वप्नांचा अर्थ शोधत राहतो पण त्यांची वास्तविकता आपल्याला कळत नाही. अशी विचित्र स्वप्नं पाहून तुम्हीही घाबरलात तर घाबरू नका. 

आपल्याला रात्री पडत असलेल्या स्वप्नांचा अर्थ स्वप्नशास्त्रात सविस्तरपणे सांगितला आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला स्‍वप्‍नाच्‍या शास्त्रात लग्नाशी संबंधित स्‍वप्‍नांचा अर्थ काय आहे ते सांगणार आहोत.

स्वप्नात वरात दिसणं

जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात लग्नाशी संबंधित स्वप्न दिसलं तर ते काही अशुभ घटना घडण्याची चिन्हं आहेत. स्वप्न शास्त्रानुसार, याचा अर्थ असा होतो की, नजीकच्या काळात तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला काही गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्ही वेळीच सावध होऊन तुमची तपासणी करून घेतली पाहिजे.

एखाद्याचं लग्न दिसणं

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही एखाद्या जोडप्याचं स्वप्नात लग्न पाहिलं तर याचा अर्थ असा होतो की, लवकरच तुमच्या आयुष्यात काही संकट येऊ शकतं. तुमची अनेक कामं अयशस्वी होऊ शकतात आणि तुम्हाला जीवनात समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

स्वतःच्या लग्नाचं स्वप्न पाहणं

स्वप्नात स्वतःचं लग्न (Dreams Related to Marriage) झाल्याचे स्वप्न पडलं तर ते खूप शुभ मानलं जातं. याचा अर्थ असा की, तुमचं वैवाहिक जीवन आनंदी होईल आणि तुमचे तुमच्या जोडीदारासोबत चांगलं संबंध निर्माण होतील.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)