'या' राशीच्या लोकांनी कधीही घालू नये काळा धागा, नाहीतर ओढावू शकते मोठे संकट

अनेकदा लोक त्यांच्या मनगटावर किंवा पायावर काळा धागा बांधतात. हे आपण पाहिलं असेल, परंतु काळा धागा बांधण्यामागे प्रत्येकाचं तसंच काहीसं कारण असतं.

Updated: May 9, 2022, 07:18 PM IST
'या' राशीच्या लोकांनी कधीही घालू नये काळा धागा, नाहीतर ओढावू शकते मोठे संकट title=

मुंबई : अनेकदा लोक त्यांच्या मनगटावर किंवा पायावर काळा धागा बांधतात. हे आपण पाहिलं असेल, परंतु काळा धागा बांधण्यामागे प्रत्येकाचं तसंच काहीसं कारण असतं. तसेच काही लोक लॉकेटसोबत काळ्या धाग्याचा वापर करतात. असे मानले जाते की काळा धागा वाईट नजरेपासून संरक्षण करते. तसेच वाईट शक्तींपासून दूर राहते. तथापि, काळा धागा सर्वांसाठी शुभ मानला जात नाही. अशा स्थितीत ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या राशीच्या लोकांनी काळा धागा घालू नये, जे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे.

या 2 राशीच्या व्यक्तींनी काळा धागा घालू नये

मेष : या राशीचा स्वामी मंगळ आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला काळ्या रंगाचा राग आहे. अशा स्थितीत या राशीच्या व्यक्तीने काळा धागा घालणे टाळावे. असे मानले जाते की, मेष राशीच्या लोकांनी काळ्या रंगाचा धागा वापरला तर त्यांच्यासोबत काहीतरी वाईट होऊ शकते.

वृश्चिक: वृश्चिक राशीचा अधिपती मंगळ आहे. मंगल देव यांना काळ्या रंगाचा तीव्र तिरस्कार आहे. यामुळेच या राशीच्या लोकांसाठी काळा रंग खूप अशुभ सिद्ध होतो. अशा स्थितीत या राशीच्या व्यक्तीने काळा धागा घालू नये. दुसरीकडे या राशीच्या लोकांनी काळा धागा घातल्यास मंगळाचा शुभ प्रभाव संपतो, परिणामी अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

काळा धागा कोणासाठी शुभ आहे?

ज्योतिष शास्त्रानुसार तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी काळा धागा खूप शुभ आहे. तूळ राशी ही शनिदेवाची उच्च राशी आहे, तर मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. अशा परिस्थितीत या राशींसाठी काळा धागा वरदान ठरतो. या राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळते. यासोबतच जीवनातून गरिबी नष्ट होते.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)