Thursday Totke For Money : कोणतेही काम पैशा अभावी होत नाही. हातात पैसा नसेल तर सारखी चिंता लागून राहते. जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील तर गुरुवारी काही उपाय केले पाहिजेत. हिंदू धर्मात गुरुवार हा भगवान विष्णूचा वार म्हणून सांगितला जातो. म्हणूनच हा दिवस श्रीहरीचा आशीर्वाद मिळविण्याचा सर्वोत्तम दिवस मानला जातो. या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. या दिवशी केलेले उपाय जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त करुन देतात.
धर्म आणि शास्त्रांमध्ये गुरुवारसाठी काही नियम आणि उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय कुंडलीत गुरु ग्रह मजबूत करतात. गुरु बलवान असल्यास जीवनात सौभाग्य वाढते, वैवाहिक सुखही मिळते. ज्या लोकांच्या कुंडलीत बृहस्पति कमजोर किंवा दुर्बल आहे त्यांनी गुरुवारी काही उपाय केले पाहिजेत. गुरुवारी काही उपाय केले तर पैशाचा ओघ चांगला राहतो.
- आपला भाग्यदयोग होण्यासाठी गुरुवारी काही उपाय करणे आवश्यक आहेत. कुंडलीत गुरु ग्रह कमजोर असेल तर अशा व्यक्तीने गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी. केळीच्या झाडात भगवान विष्णू वास करतात असे मानले जाते. तसेच केळीच्या झाडाखाली दिवा लावावा. असे केल्याने भरपूर संपत्ती मिळते. तसेच लग्न लवकर जुळते. गुरुवारी कधी केळी खाऊ नका, हेही लक्षात ठेवा.
- गुरुवारी सोने, हळद, हरभरा, पिवळी फळे इत्यादी पिवळ्या वस्तूंचे दान करा. गुरुवारी गुळाचे दान केल्याने खूप फायदा होतो.
- दर गुरुवारी पाण्यात चिमूटभर हळद टाकून स्नान करावे. त्यामुळे गुरुचा आशीर्वाद मिळतो.
- गुरुवारी पिवळे कपडे परिधान केल्याने कामात यश मिळते. स्थानिकांना नशिबाची साथ मिळेल.
- भगवान विष्णूची कृपा आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी गुरुवारी व्रत ठेवा. या दिवशी व्रत ठेवेल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. तसेच विधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा करा. पूजेमध्ये पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा आणि हा प्रसाद म्हणून स्वत: घ्या.
- प्रगतीत अडथळा येत असेल किंवा पैसे मिळण्यास अडचणी येत असतील तर केळीच्या झाडाच्या मुळाचा तुकडा पिवळ्या कपड्यात बांधून गुरुवारी गळ्यात घाला. असे केल्याने सर्व अडथळे लवकर दूर होतील आणि वेगाने प्रगती होईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)