मेष - काही कामांमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. मेहनत घ्यावी लागेल. काम बदलण्याचा विचार करु शकाल पण, विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणत्याही कामात घाई करु नका, अडचणीत याल. आरोग्याची काळजी घ्या. नवीन वाहन खरेदी करायची इच्छा होईल.
वृषभ- व्यसायात फायदा होईल. नोकरीमध्ये पदोन्नती होणार आहे. सरकाऱ्यांची मदत मिळेल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. कामाच्या पद्धतीमध्ये बदल होतील. काही बाबतीत तणाव असेल. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. पगारवाढ होण्याची शक्यता.
मिथुन- नक्षत्रांची स्थिती चांगली आहे. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता. अडकलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता. काही नव्या लोकांना भेटण्याची शक्यता. साथीदारांकडूनही धनलाभ होण्याची शक्यता. सामाजिक आणि सामूहिक कामांमध्ये नव्या लोकांची भेट होऊ शकते. आरोग्याच चांगल्या सुधारणा होतील.
कर्क- कामाच्या ठिकाणी तुम्ही अनेकांची मनं जिंकू शकतात. नोकरी बदलण्याचा विचार कराल, पदारवाढीचेही विचार कराल. काही नवी कामांमध्ये यश मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवहारात फायदा होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबसुख मिळेल. अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे सांभाळून राहा.
सिंह- सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळण्यातही अडचणी येतील. सावध राहा. नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायात जी नवी कामं हातात घ्याल त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या बाबतीत अनुभवी व्यक्तींचा सल्ले घ्या. घाई करु नका. एकटेपणापासून दूर राहा. अडकलेल्या कामांना पूर्णत्वास नेण्यातही काही अडचणी येतील. साथीदारासोबत प्रवासयोग आहे.
कन्या- नोकरी आणि व्यवसायात काही मोठे निर्णय होण्याची शक्यता. आर्थिक स्थिती सुधारेल. खर्चांमध्ये कपात करण्याचा विचार कराल. साथीदाराकडून सुरेख अशी भेटवस्ती मिळेल. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होणार. न मागता कोणालाही सल्ला देण्यास पुढे जाऊ नका. आरोग्याच सुधारणा होईल.
तुळ- अडकलेली कामं पूर्ण होतील. कामात वेळीच सहकार्य न मिळाल्यास अडचणी येतील. काहीजण तुमच्या विरोधात जातील. नवे विचार कराल. येत्या दिवसांमध्ये काही मोठी कामं हाती घ्याल. लग्नाचे प्रस्ताव येतील. विवाहित व्यक्तींसाठी दिवस चांगला असेल.
वृश्चिक- व्यवसायात फायदा होईल. नोकरदार वर्गासाठी चांगली वेळ सुरू आहे. अडकलेली कामं पूर्णत्वास न्याल. शत्रूवर मात कराल. काही मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाल. बऱ्याच संधी तुम्हाला मिळतील. प्रवासासाठी नव्या ठिकाणी जाल. आरोग्याची काळजी घ्या.
धनू- नोकरीच्या ठिकाणी काही कामांमध्ये अडथळे निर्माण होतील. कायद्याच्या कचाट्यात अडकाल. नको त्या कामांमध्ये वेळ वाया जाण्यची चिन्हं. कामाच्या निमित्ताने बाहेरगावी जाण्याचा योग. अविवाहित लोकांसाठी चांगला काळ आहे. आरोग्याची काळजी घ्या.
मकर- जुन्या अडचणी, वाद संपुष्टात येतील. परिस्थिती अनुकूल आहे. अडकलेली कामं पूर्ण करण्याच्या दिशेने पावलं उचला. कोणावरही विश्वास ठेवू नका. साथीदाराशी मतभद होऊ शकतात. आजारपणापासून दूर राहाल.
कुंभ - दिवस चांगला असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. अनुभवी व्यक्तींचा सल्ला मिळेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगली वेळ. आरोग्याची काळजी घ्या.
मीन- अचानक फायदा होण्याची चिन्हं. साथीदाराच्या मदतीने धनलाभ संभाव्य. जुना व्यवहार पूर्ण होईल. नको त्या ठिकाणी पैसे खर्च करु नका. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळेल. काहीही बोलताना सावधगिरी बाळगा. ऋतूचक्रातील बदलांमुळे होणाऱ्या आजारांपासून दूर राहा.