आजचे राशीभविष्य | बुधवार | १० जुलै २०१९

असा असेल तुमचा आजचा दिवस... 

Updated: Jul 10, 2019, 09:03 AM IST
आजचे राशीभविष्य | बुधवार | १० जुलै २०१९ title=

मेष- आर्थिक व्यवहारांमध्ये विचार करा. साथीदाराचा सल्ला फायद्याचा ठरेल. अर्थार्जनाच्या योजना आखाल. नोकरीचा चांगला प्रस्ताव मिळेल. चांगल्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. सतत एखाद्या गोष्टीचा विचार करत असाल. नोकरीच्या ठिकाणी सहकारी मदतीचे ठरतील. 

वृषभ- चांगले बेत आखल्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. विचाराधीन कामं पूर्ण होतील. नोकरीच्या बाबतीत काही बदल करण्याचे योग आहेत. दैनंदिन जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल होतील. नव्या गोष्टींची खरेदी तुमच्यासाठी फायद्याची ठरु सकते. विद्यार्थ्यांना यश मिळेल. 

मिथुन- आज तुम्ही एखादा नवा प्रयोग कराल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. अंतर्मनाची साद ऐका. इतरांशी ताळमेळ साधा. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा योग आहे. 

कर्क- प्रयत्न कराल तर, हमखास यशस्वी व्हाल. काही कामांसाठी एखाद्या व्यक्तीचा होकार तुम्हाला मिळेल. काही वेळ एकांतात व्य़तीत करा. काही कौटुंबीक प्रकरणं तुमच्या समोर येतील. तडजोड करण्याचा विचार करुनच घराबाहेर पडा. नोकरीच्या ठिकाणी एखादी अशी तडजोड करावी लागू शकते जी, पुढे जाऊन तुमच्याच फायद्याची ठरेल. 

सिंह- आज तुमची कामं पूर्णत्वास नेण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न कराल. व्यग्र असूनही आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आर्थिकदृष्ट्या फायदा होईल. नवी नोकरी मिळेल. नोकरी आणि व्यापाराच्या ठिकाणी धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

कन्या- नोकरीच्या बाबतीत आज बऱ्याचदा यश मिळेल. करिअरमध्ये असणारी गुंतागुंत कमी होईल. ताण घेऊ नका. नोकरीवर तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. नव्या मित्रमंडळींना भेटण्याची संधी मिळेल. व्यापारात अडकलेले पैसे परत मिळतील. वरिष्ठांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठराल. 

तुळ- स्वत:वर विश्वास ठेवा. मेहनत करा. माहिती मिळवा. इतरांची भेट घ्या, गरज असल्यास प्रवासही करा. जुन्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करा. राहणीमानाचा स्तर उंचावेल.

वृश्चिक- नोकरीच्या ठिकाणी एखादी वाढीव जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येईल. एखाद्या नव्या कामाची सुरुवात करण्याचा विचार तुम्ही कराल. कामातीच अडचणी दूर होतील. एखाद्या अशा व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल ज्याचा तुमच्या आयुष्यावर बराच प्रभाव पडेल. 

धनु- जास्तीत जास्त अडचणींवर तोडगा काढण्यात यशस्वी ठराल. एखाद्या मोठ्या गुंतवणूकीचा तुम्हाला फायदा होईल. काही रंजक गोष्टी कळतील. प्रभावी व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. नोकरी किंवा व्यापारात एकादा बदल करण्याचा विचार कराल. 

मकर- धैर्य आणि सातत्याने जितकी मेहनत केली होती, त्याचे परिणाम तुमच्याच पारड्यात असतील. जुन्या मित्रांशी संवाद किंवा भेट होऊ शकते. जबाबदारी पूर्ण कराल. विचाराधीन कामं पूर्ण होतील. सोबत असणाऱ्या व्यक्तींचं तुमच्यावर लक्ष असेल. 

कुंभ- काही महत्त्वाचे बदल आजपासून घडू लागतील. गूढ गोष्टींकडे तुमचा कल असेल. चांगल्या व्यवहारामुळे तुम्ही यशस्वी ठराल, सोबतच तुम्हाला भेटणारेही आनंदित होतील. साकारात्मक दृष्टीकोन ठेवा. 

मीन- चांगल्या संधी मिळतील. नवे बेत आखण्याची संधी आहे. नोकरीत बढती किंवा एखादं मानाचं पद मिळण्याची शक्यता आहे. धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला एखादा प्रवास करावा लागू शकतो. इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका.