मेष- धनलाभ होण्याची शक्यत आहे. शत्रुवर विजय मिळवू शकता. नोकरीच्या ठिकाणी जास्त मेहनत घ्यावी लागेल. प्रगीत होणार आहे. आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. आजचा दिवस चांगला आहे. मित्रांची मदत मिळेल. विवाहप्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
वृषभ- तुमच्या बोलण्याचा इतरांवर परिणाम होणार आहे. अनेकजण तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील. एखाद्या समारंभाचं बोलावणं येईल. आज एखादा असा प्रवासयोग आहे, ज्याचा फायदा तुम्हाला येत्या काळात होणार आहे.
मिथुन- आर्थिक स्थिती सुधारेल. अर्थाजनात वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुम्हीही थक्क व्हाल. गोष्टींचा गांभीर्याने विचार करा. सर्वकाही सुरळीत होईल.
कर्क- करिअरवरच तुमचं संपूर्ण लक्ष असेल. आज तुम्ही जास्तच भावनात्मक विचार कराल. मित्रांसमवेत वेळ चांगल्या प्रकारे व्यतीत होईल. कुटुंबासोबतही चांगला वेल व्यतीत कराल.
सिंह- सामाजिक वर्तुळात आज बऱ्यापैकी सक्रिय असाल. कोणत्याही कठिण प्रसंगाचा सामना करण्यासाठी तयार असाल. जास्तीत जास्त मित्र तुमची साथ देतील. एखाद्या मित्राची नकळत मदत होईल. नवी जबाबदारी मिळेल. आर्थिक अडचणींवर मात कराल.
कन्या- आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य आहे. देवाण-घेवाण आणि गुंतवणुकीचे बेत आखाल. तुमच्या आजुबाजूला बरीच धावपळ असेल. एकाग्रता शिगेला असेल. एकाच वेळी अनेक कामं सांभाळावी लागतील. जास्त काम आणि जास्त मेहनत करावी लागेल. यश मिळण्याची दाट शक्यता आहे.
तुळ- आज तुमची कामं थांबणार नाहीत. कोणत्याही कामाची सुरुवात कराल, तर तुमच्या मनात असणारा संकोचलेपणाही दूर होईल. इतरांच्या गरजा पूर्ण करण्यावर भर द्या. कामं वेळेत पूर्ण होतील.
वृश्चिक- पद, वेतन किंवा अधिकार वाढतील. कोणा एका नव्या ठिकाणी फिरण्यासाठी जाण्यची संधी मिळेल. मनात आणि डोक्यात अनेक विचारांची उलथापालथ असेल. शक्य तितके वास्तववादी राहा.
धनु- महत्त्वाच्या व्यक्तींशी चांगल्या पद्धतीने मेळ साधाल. महत्त्वपूर्ण नाती आणखी दृढ होतील. पैशांचा विचार कराल. काही नव्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्याचा आनंदाने स्वीकार करा. कुटुंबात एकी राखा.
मकर- व्यवसाय आणि नोकरीमध्ये काही चांगलं घडण्याचे संकेत मिळतील. एखाद्या खास गोष्टीवर तुम्ही चर्चा कराल. आर्थिक विषयांवर इतरांना सल्ले द्याल. घर खरेदी करण्याची संधी मिळेल. धार्मिक यात्रा कराल.
कुंभ - जुन्या नात्यांना आणखी दृढ करण्याची संधी मिळेल. काही नवं काम हाती घेण्यापूर्वी दैनंदिन जबाबदाऱ्यांकडेही लक्ष द्यावं लागतं ही बाब अंदाजात घ्या. इतरांची मदत केल्याने आज तुम्हाला आनंद मिळणार आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. विचाराधीन कामं पूर्ण होतील. वडिलांची मदत मिळेल.
मीन- आयुष्यात काही महत्त्वाचे बदल होतील. अडचणी दूर होतील. तुमच्याकडे जास्त वेळ असेल. अनेक गोष्टींमध्ये यश मिळेल. तुमच्या नव्या प्रयत्नांना यश मिळेल.