close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | सोमवार | १९ ऑगस्ट २०१९

जाणून घ्या कसा आहे, तुमचा आजचा दिवस 

Updated: Aug 19, 2019, 08:43 AM IST
आजचे राशीभविष्य | सोमवार | १९ ऑगस्ट २०१९

मेष- कामासाठी नवी जागा खरेदी करण्याचा विचार कराल. कामाच्याच निमित्ताने प्रवास करण्याचा योग आहे. कामाच्या पद्धतीत सुधारणा होईल. साथीदाराकडून एखादी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. कोणत्याही बाबतीत भावूक होऊ नका. 

वृषभ- आजचा दिवस तुमच्यासाठी आळसावलेला असेल. मतभेद होण्याची शक्यता आहे. जुन्या कामांचा आज आढावा घ्याल. गरजेनुसार पैशांची व्यवस्था होईल. साथीदाराच्या वागणुकीमुळे अडचणी येतील. विवाहितांसाठी मात्र दिवस चांगला आहे. 

मिथुन- व्यवसायामध्ये मित्रांची मदत मिळेल. दैनंदिन कामांमध्ये दिवस चांगला आहे. अपूर्ण कामं पूर्ण होतील. काही जुन्या गोष्टी विसराव्या लागतील. लहानसहान गोष्टींवर चिडणं थांबवा. 

कर्क- दैनंदिन कामांमध्ये मन रमणार नाही. मनात येणाऱ्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला अडचणीत आणतील. भावना आणि रागावर नियंत्रण ठेवा. जास्त मेहनत करावी लागू शकते. एखादं काम पूर्ण करण्यासाठी जितका प्रयत्न कराल तितकेच यशस्वी ठराल. 

सिंह- नोकरीच्या ठिकाणी वायफळ वादांपासून दूर राहा. वरिष्ठांवर तुमचा प्रभाव असेल. काही बाबतीत तडजोड करावा लागू शकतो. महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या. विचाराधीन कामं पूर्ण होतील. नवे बेत आखाल. 

कन्या- नोकरीच्या ठिकाणी नको त्या कामांमध्ये वेळ वाया जाईल. जास्त परिणामांसाठी जास्त मेहनतही करावी लागू शकते. नोकरी बदलण्याची इच्छा असेल तर, सावध राहा. वैवाहिक आयुष्य़ सुखी असेल. आरोग्याची काळजी घ्या. 

तुळ- व्यवसायात फायदे होण्याता योग आहे. जास्त मेहनत करावी लागू शकते. इतरांची मदत करा, तुमचाच फायदा होणार आहे. विवाहितांना साथीदाराचं सहकार्य मिळणार आहे. आरोग्याच्या बाबतीत बेजबाबदारपणा करु नका. 

वृश्चिक- जास्त मेहनत करावी लागू शकते. कामाचा व्याप वाढेल. प्रेम व्यक्त करण्यास संकोचू नका. वाहन चालवतेवेळी सावधगिरी बाळगा. करिअरचा गांभीर्याने विचार करा. कामाच्या पद्धतीत आज बदल होणार आहे. एखादा नवा बेत आखाल. 

धनु- दिवसभर व्यग्र असाल. वरिष्ठ तुमच्या मतांनाही महत्त्व देतील. कामाच्या ठिकाणी आदर मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. कामाची पद्धत बदलेल. अर्थार्जनात वाढ होईल. आरोग्यात सुधारणा होईल. 

मकर- व्यापार वाढे. कनिष्ठांकडून मदत मिळेल. एखादी अडचण दूर होईल. विचारपूर्वकपणे काम करा. व्यापारात फायदा होण्याची चिन्हं आहेत. आराम करा. थकवा दूर होईल. 

कुंभ- वेळ तुमचीच आहे. व्यापारात प्रगती होण्याची चिन्हं आहेत. नोकरीच्या प्रश्नात मुलाखतीची बाब असेल तर, त्यात यशस्वी ठराल. वरिष्ठांशी असणाऱ्या संबंधांमधेय सुधारणा होईल. तुम्ही इतरांवर प्रभाव पाडू शकता. 

मीन- व्यवसायात आज कमी फायदा होणार आहे. बदलीची शक्यता आहे. एखादी अशी माहिती मिळेल, ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायात अडचणी निर्माण होतील. जुने मित्र अचानक भेटतील. गरज असेल तेथे तडजोड करण्यास तयार राहा.