close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | शुक्रवार | २३ ऑगस्ट २०१९

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस 

Updated: Aug 23, 2019, 07:30 AM IST
आजचे राशीभविष्य | शुक्रवार | २३ ऑगस्ट २०१९

मेष- व्यापारासाठी आजचा दिवस चांगला नाही. कोणालाही कर्ज देऊ नका. एखाद्या जुन्या कामाचा व्याप नाहीसा होईल. कोणा एका व्यक्तीशी भांडण होऊ शकतं. खाण्यापिण्याच्या बाबतीत काळजी घ्या. 

वृषभ- विचाराधीन कामं पूर्ण होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. विचार करण्याच्या पद्धती बदलतील. मित्र आणि कुटुंबाचं सहकार्य मिळेल. 

मिथुन- व्यवसायात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. साथीदाराचं सहकार्य मिळेल. तुम्हाला सहकार्य मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. 

कर्क- कामाच्या ठिकाणी असणारं वातावरण पाहता तुमची चीडचीड होईल. प्रेमसंबंधांमध्ये काही अडचणी येतील. कोणावरही अवलंबून राहू नका. आरोग्यात चढ- उतार संभवतील. 

सिंह- आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. तुम्ही इतरांना प्रभावित कराल. विचार करण्याची पद्धत इतरांना आवडेल. तुमच्या सल्ल्याचा इतरांना फायदा होईल. साथीदारांच्या भावना समजून घ्याल. 

कन्या- कुटुंबाची मदत मिळेल. मानसिक संतुलन बिघडेल. कामं पूर्णत्वास जातील. करिअर आणि गुंतवणूकीच्या बाबतीत काही महत्त्वाच्या संधी मिळतील. आरोग्य सुधारेल. 

तुळ- तुमच्या मेहनतीला यश मिळेल. बऱ्याच इच्छा पूर्ण होतील. बढती मिळण्याची शक्यता आहे. कोणतीही संधी सोडू नका. ज्या प्रकरणात तुम्ही डोकावाल त्यात तुम्हाला यश मिळेल. 

वृश्चिक- आर्थिक नुकसान होईल. काही कायदेशी बाबी अडचणीत आणू शकता. वेळ लक्षात ध्या. तुम्हाला जास्त मेहनत करावी लागू शकते. थोडा थकवा जाणवेल. 

धनु- शेअर बाजारात विचारपूर्वक गुंतवणूक करा. करिअरच्या दृष्टीने थोडे सावध रहा. आज काही बाबतीत अडचणी उदभवतील. एखादं खास काम पूर्ण होण्याची आशा होती, पण ते न झाल्यान निराश होऊ नका. 

मकर- तुमचं नुकसान होऊ शकतं. दिखाव्यापासून दूर राहा. कुटुंबात आर्थिक परिस्थितीवरुन फायदा मिळेल. जास्तीची जबाबदारी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. 

कुंभ- करिअरच्या दृष्टीने एखादी चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्धींवर तुमचं वर्चस्व असेल. जुन्या वादांवर तोडगा निघेल. परिस्थिती तुमच्या बाजूने आहे. आज नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. 

मीन- करिअरशी जोडल्या गेलेल्या गोष्टींविषयी संवेदनशील निर्णय घेताना थोडे सावध रहा. प्रमाणाहून जास्त थकवा जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या.