close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | गुरुवार | २२ ऑगस्ट २०१९

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस 

Updated: Aug 22, 2019, 07:35 AM IST
आजचे राशीभविष्य | गुरुवार | २२ ऑगस्ट २०१९

मेष- नव्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. लोकांना तुमच्याबद्दल सहानुभूती असेल. आज तुम्हीच बऱ्याच अंशी भावनिक असाल. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळेल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. 

वृषभ- नोकरीसापेक्ष व्यक्तींच्या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. याचा तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. आज तुम्ही महत्त्वाची कामं आटपाल. करिअर आणि खासगी आयुष्यात प्रगती होण्याचा योग आहे. 

मिथुन- आज विचारपूर्वक निर्णय घ्या. पुढे जाण्याची संधी आहे. तुमच्या विचारांच्या बळावर इतरांची मनं जिंकण्यात यशस्वी व्हाल. नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. याचा फायदाच तुम्हाला होणार आहे. 

कर्क- आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. उत्साह वाढलेला असेल. घर आणि आजूबाजूची परिस्थिती तुमच्या नियंत्रणात असेल. अडकलेले पैसे परत मिळतील. मोठ्या निर्णयांसाठी आजचा दिवस चांगला आहे. 

सिंह- मोठ्या कामांवर लक्ष द्या. आत्मविश्वास वाढलेला असेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. काही नवे आणि तितकेच रोचक अनुभव मिळतील. साथीदारासोबतचं नातं आणखी दृढ होईल. ज्यामुळे पुढे जाण्यास मदत होणार आहे. 

कन्या- ज्या कामांची जबाबदारी तुम्हाला मिळाली आहे, त्यांचा आनंदाने स्वीकार करा. मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. नोकरी किंवा कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. 

तुळ- आज तुम्ही आनंदात राहण्याचा प्रयत्न कराल. भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या खास व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. 

वृश्चिक- चांगल्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळू शकते. ज्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे. जबाबदाऱ्यांवर लक्ष द्या. आज व्यापारासाठी चांगले योग आहेत. 

धनु- आज तुम्ही भावना चांगल्या पद्धतीने व्यक्त करु शकता. कुटुंबासोबत एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करा. गांभीर्याने केलेल्या चर्चेमुळे, गोष्टींवर तोडगा निघेल. एखादी शुभवार्ता कळेल. 

मकर- लहानमोठे प्रवासयोग आहेत. काही खास व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. मेहनतीची कामं करावी लागू शकतात. एखादी शुभवार्ता कळू शकेल. 

कुंभ- काही व्यक्तींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात यशस्वी ठराल. जवळच्या व्यक्तींची काळजी घ्याल. नोकरीच्या ठिकाणी जबाबदारीची कामं मिळतील. कुटुंबासोबत शुभकार्यात सहभागी व्हाल. मोठ्या भावंडांची मदत मिळेल. 

मीन- स्वत:वर विश्वास ठेवून आत्मविश्वासाने पुढे जा. बिजनेस आणि नोकरीच्या खास कामांच्या बळावर पुढे जा. आर्थिक परिस्थिती सुधारेल. आखलेले बेत पूर्णत्वास जातील.