आजचे राशीभविष्य | रविवार | २९ डिसेंबर २०१९

'या' राशीच्या व्यक्तींचा दिवस आनंदात जाईल

Updated: Dec 29, 2019, 08:50 AM IST
आजचे राशीभविष्य | रविवार | २९ डिसेंबर २०१९

मेष - काही बदल होण्याची शक्यता आहे. अचानक काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात समस्यांचा सामना करण्यासाठी तयार राहा. स्वत:कडे लक्ष देण्याची गरज आहे. 

वृषभ - दुसऱ्यांच्या भांडणात पडू नका. स्वत:च्या कामाकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी गोष्टी अनुकूल राहतील. अनेक गोष्टींचा विचार मनात राहील.

मिथुन - जुन्या गोष्टींमध्ये अडकाल. चिंता कमी करा. स्वत:कडे लक्ष देण्याची गरज आहे. तब्येतीची काळजी घ्या. सकारात्मक राहा.

कर्क - वेळ चांगला आहे. तुमच्या लक्ष्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करा. गैरसमज करुन घेऊ नका. शब्दांचा जपून वापर करा.

सिंह - उत्साही, सकारात्मक राहाल. ताण घेऊ नका. वेळनुसार तुम्हाला मदत मिळेल. कामाचा व्याप असेल. 

कन्या - महत्वाकांक्षी राहाल. जवळच्या लोकांची मदत होईल. प्रवासाचा योग आहे. कामात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. चांगले अनुभव येतील.

तुळ - प्रवास होऊ शकतो. जोडीदाराच्या भावनांचा विचार करा. इतरांशी खुलेपणाने बोला. बोलताना विचार करा. कामात यश मिळेल.

वृश्चिक - मन विचलित होईल. कामात बदल होऊ शकतात. नवीन मार्ग मिळू शकतात. पुढील योजना आखताना विचार करुनच निर्णय घ्या.

धनु - तब्येत चांगली राहील. दिवस आनंदात जाईल. व्यायाम करा. जेवणात मसालेदार पदार्थांचा समावेश टाळा. मनात अनेक विचार सुरु राहतील.

मकर - अनेक दिवसांपासून असलेला ताण कमी होऊ शकतो. नवीन जबाबदारी मिळू शकते. भावंडांची मदत होईल. जे सुरु आहे तसंच सुरु ठेवा. निराश होऊ नका.

कुंभ - कुटुंबात वाद होऊ शकतो. मित्रांसोबत वेळ घालवाल. रखडलेली कामं जोडीदाराच्या मदतीने पूर्ण होतील. पैशांसंबंधी गोष्टी सुधारु शकतात. 

मीन - इतरांची मदत होऊ शकते. कुटुंबाच्या गरजांकडे लक्ष द्या. कुटुंबासाठी अधिक वेळ द्यावा लागेल. नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे.