close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | मंगळवार | १७ सप्टेंबर २०१९

जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल.

Updated: Sep 17, 2019, 08:20 AM IST
आजचे राशीभविष्य | मंगळवार | १७ सप्टेंबर २०१९

मेष- एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. जोडीदारासोबत चांगले क्षण व्यतीत कराल. आज केलेली एखादी गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल. तणाव कमी होईल. 

वृषभ- नोकरी किंवा व्यवसायात सांभाळून काम करा. पैशांची काळजी घ्या, अकारण वाद ओढावून घेऊ नका. कोणतीही आर्थिक जोखीम पत्कारू नका. कामाचा व्याप वाढेल.

मिथुन- नोकरीच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल, जास्त मेहनत करावी लागू शकते. भीती आणि असुरक्षेच्या भावनेने मन व्यापून जाईल. जुन्या व्याधींबाबत निष्काळजीपणा करु नका. 

कर्क- व्यावसयिक दृष्टीकोनातून आजचे ग्रहमान उत्तम. जुनी कामे यशस्वीपणे पूर्ण कराल. नवीन कामे मिळतील. मेहनतीचे योग्य फळ तुमच्या पदरात पडेल. जोडीदाराला समजून घेतल्यास नाते आणखी घट्ट होईल. 

सिंह- नोकरी आणि व्यवसायात अनुकूल ग्रहमान. मित्रांची मदत घेतल्यास धनलाभ होण्याची शक्यता. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. नियोजित कामे मार्गी लागतील. इतरांवर छाप पाडण्यात यशस्वी व्हाल. 

कन्या- नोकरी किंवा व्यवसायात चढउतार येण्याची शक्यता. आर्थिक नुकसान होण्याची योग संभवतो. सावधानतेने व्यवहार करा. कामात अडथळे येतील, फायद्याची शक्यता धुसर असेल. 

तूळ- व्यवसायात अचानक फायदा होण्याचा योग संभवतो. नोकरी आणि व्यवसायात वरिष्ठांची मर्जी राखण्यात यशस्वी व्हाल. प्रेमसंबंधांत आणखी मधुरता येईल, संबंध दृढ होतील. 

वृश्चिक- नोकरीच्या ठिकाणी मेहनतीचा फायदा होईल. पैसे आणि नोकरीसंदर्भातील समस्यांवर महत्त्वाचा सल्ला मिळू शकतो. आर्थिक परिस्थिती सुधारेल. आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील. 

धनु- नोकरी आणि व्यवसायातील अडचणींमुळे तणाव येईल. कोणताही विचार न करता निर्णय घेऊ नका. गोष्टी मनासारख्या होण्यासाठी आणखी काही अवधी जाण्याची गरज. एखाद्या कामात पुढाकार घेण्यात संकोच करू नका. 

मकर- नोकरीतील काही समस्यांमुळे तणावात राहाल. जोखमीच्या व्यवहारात नुकसान होईल. वायफळ खर्च वाढतील. एखाद्या जुन्या गोष्टीमुळे आपल्याच लोकांकडून दुखावले जाल.

कुंभ- प्रलंबित कामे मार्गी लागतील, स्वत:वर विश्वास ठेवा. आजचा दिवस सकारात्मक असेल. वैवाहिक जीवनात रोमँटिक क्षण अनुभवायला मिळतील. 

मीन- नोकरी आणि व्यवसायात फायद्याचा योग संभवतो. नियोजनपूर्व काम करणे फायदेशीर ठरेल. एखादा आर्थिक व्यवहार पूर्णत्त्वाला जाईल. एखादे प्रलंबित काम इतरांच्या मदतीने मार्गी लागेल.