Astrology Upay for Homes : 'हे' उपाय करा आणि मिळवा हक्काचं घर!

Astrology Upay for Homes : हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण मंडळाच्या घरांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघणार आहे. पण अनेक वेळा फॉर्म भरून पण घर विकत घेण्यात अडचणी येतात.

Updated: Jan 9, 2023, 10:50 AM IST
Astrology Upay for Homes : 'हे' उपाय करा आणि मिळवा हक्काचं घर! title=
trending news astrology remedies for buy home marathi news

Astrology Tips to Buy  Own Home : आपलं हक्काचं आणि स्वत:चं घर असावं हे स्वप्न उराशी बाळगूण अनेक जण दिवसरात्र मेहनत करत असतात. सर्वसामान्यांना त्यांचं हक्काचं घर मिळावं म्हणून सिकडो आणि म्हाडा घरांची लॉटरी काढतात. पुणे म्हाडाने (Pune Mhada) 5 हजार 966 घरांची जम्बो लॉटरी (Mhada Lottery 2023) काढली आहे. या घरांसाठी पाच जानेवारीपासून नोंदणीला सुरुवात झाली असून  17 फेब्रुवारीला या घरांची सोडत निघणार आहे. त्यात कोकण मंडळाच्या (Konkan Mhada Lottery) तब्बल 4000 घरांची लवकरच लॉटरी निघणार आहे. पण अनेक वेळा पैसे असताना किंवा फॉर्म भरूनही तुमचे घराचे स्वप्न पूर्ण होतं नाही. ज्योतिष्यशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत काही ग्रह दोष असेल तर घर खरेदीमध्ये अडचणी येतात असं म्हटलं जातं. जर तुम्हाला ही घर खरेदी करताना काही अडचणी येत असेल तर ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. (trending news astrology remedies for buy home marathi news)

हे उपाय करा आणि मिळवा हक्काचं घर

1. ज्योतिषशास्त्रानुसार गणरायाची नियमित पूजा-अर्चा केल्यास तुमचं घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकतं. गणपतीला नियमितपणे लाल रंगाची फुलं अर्पण केली पाहिजे. 

2. पाच मंगळवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन गूळ आणि गहू अर्पण केल्यास घर खरेदीतील अडथळे दूर होऊ शकतात. 

3. अनेक प्रयत्न करुनही घराचं स्वप्न पूर्ण होत नसेल तर कडुलिंबाचे छोटे घर बांधून एका गरीब मुलाला द्या किंवा एखाद्या मंदिरात ठेवा. 

4. लाल रंगाच्या कपड्यात  6 चिमूटभर कुमकुम, 6 लवंगा, नऊ टिकली, 6 कोवळ्या आणि नऊ मूठ माती घेऊन त्याची पोटली बनवा आणि नदीत ती प्रवाहित करा. 

5. कुंडलीतील ग्रह तुमच्या घरासंबंधित खरेदीमध्ये अडचणी निर्माण करतात म्हणून अशावेळी एखाद्या ज्योतिषला आपली कुंडली दाखवून त्यांनी सांगितलेले उपाय करुन बघा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)