Trigrahi Yog: दोन दिवसानंतर कन्या राशीत त्रिग्रही योग, 4 राशींवर कसा असेल प्रभाव जाणून घ्या

ग्रहांच्या गोचराचा प्रभाव सर्वसमावेशक असतो. त्यामुळे वैयक्तिक कुंडलीतील ग्रह जर त्या स्थानी असले की, त्याचा प्रभाव जास्त असतो.

Updated: Sep 21, 2022, 12:54 PM IST
Trigrahi Yog: दोन दिवसानंतर कन्या राशीत त्रिग्रही योग, 4 राशींवर कसा असेल प्रभाव जाणून घ्या title=

Trigrahi Yog: ग्रहांच्या गोचराचा प्रभाव सर्वसमावेशक असतो. त्यामुळे वैयक्तिक कुंडलीतील ग्रह जर त्या स्थानी असले की, त्याचा प्रभाव जास्त असतो. इतर वेळी ढोबळमानाने त्या राशींच्या लोकांवर कसा प्रभाव पडेल याबाबत भाकीत केलं जातं. सप्टेंबर महिन्यात ग्रहांचं गोचर पाहायला मिळालं. आता 24 सप्टेंबरला कन्या राशीत तीन ग्रह एकत्र येणार आहेत. शुक्र, बुध आणि सूर्य एकत्र येणार आहेत. कन्या राशीत बुध आणि सूर्य ग्रह आधीच ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे कन्या राशीत बुधादित्य योग तयार झाला आहे. आता शुक्राच्या गोचरामुळे त्रिग्रही योग तयार होणार असून वृश्चिक, धनु,  सिंह आणि कर्क राशींना चांगली फळं मिळतील. 

वृश्चिक: या राशीच्या 11व्या स्थानात त्रिग्रही योग तयार होणार आहे. हे स्थान घर उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते. या युतीमुळे आगामी काळात वृश्चिक राशीच्या लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तुम्हाला पैसे कमविण्याच्या चांगल्या संधी मिळतील. मान-सन्मानात वाढ होईल. नशिबाची चांगली साथ मिळेल. 

धनु: त्रिग्रही योग दहाव्या स्थानात होणार असून हे स्थान व्यवसाय, नोकरी आणि नोकरीशी संबंधित आहे. अशा स्थितीत कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. व्यवसायात चांगला नफा होईल. तसेच नोकरीमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणांहून चांगल्या ऑफर्स येऊ शकतात. 

सिंह: या राशीच्या द्वितीय स्थानात त्रिग्रही योग तयार होत असून दुसरे स्थान धन आणि वाणीचे आहे. या काळात इतर लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित कराल आणि अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात चांगले आणि मोठे बदल पाहायला मिळतील. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल.

कर्क:  तीन ग्रहांचा युती कर्क राशीच्या तिसऱ्या स्थानात तयार होणार आहे. तिसरे स्थान घर सुख आणि उत्तम आरोग्याशी संबंधित आहे. या काळात तुमची मानसिक क्षमता वाढलेली दिसेल. करिअरमध्येही चांगली वाढ होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आगामी काळात चांगली होणार आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)