Tirgrahi Yog In Kanya: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. शनी एका राशीत सुमारे अडीच वर्षे आणि राहू-केतू 18 महिने राहतो, तर चंद्र अवघ्या अडीच दिवसांत आपली राशी बदलतो. या काळात चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोगाने असतो.
आता चंद्राने 8 नोव्हेंबर रोजी पहाटे 2:01 वाजता बुध ग्रहाच्या कन्या राशीत प्रवेश केला आहे. तर त्यानंतर तो 11 नोव्हेंबरला तूळ राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत केतू आणि शुक्र आधीच कन्या राशीत आहेत. यामुळे कन्या राशीमध्ये त्रिग्रही योग तयार झाला आहे. हा योग अनेक राशींच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या लोकांना या त्रिग्रही योगामुळे फायदा होणार आहे.
शुक्र, केतू आणि चंद्र यांचा संयोग पहिल्या घरात झाला आहे. या राशीच्या लोकांची रखडलेली काम पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात. व्यवसायात भरपूर नफा कमावण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहणार आहे. नोकरदारांना बोनस मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते.
या राशीमध्ये शुक्र आणि केतू यांचा संयोग नवव्या भावात होणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना त्रिग्रही योग तयार होऊन लाभ मिळू शकतो. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. शुक्राच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोकही यश मिळवू शकतात. यावेळी नशीब तुम्हाला साथ देणार आहे. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने त्रिग्रही तुमच्यासाठी शुभ ठरेल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )