Guru Margi: वर्षाच्या अखेरीस गुरु होणार मार्गस्थ; 2024 मध्ये 'या' राशींचं नशीब उजळणार

Guru Margi In Mesh: बृहस्पति मेष राशीत मार्गस्थ होणार असल्याने नवीन वर्ष 2024 अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंद आणू शकणार आहे. बृहस्पति मार्गी असल्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा काही ना काही परिणाम होतो.

सुरभि जगदीश | Updated: Nov 10, 2023, 07:15 AM IST
Guru Margi: वर्षाच्या अखेरीस गुरु होणार मार्गस्थ; 2024 मध्ये 'या' राशींचं नशीब उजळणार title=

Guru Margi In Mesh: वैदिक ज्योतिष्य शास्त्रात प्रत्येक ग्रह महत्त्वाचा मानला जातो. देवतांचा गुरू बृहस्पति नवग्रहात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु सध्या स्वतःच्या राशीत म्हणजेच मेष राशीमध्ये आहे. वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 07:08 वाजता गुरू मार्गी होणार आहे. 

बृहस्पति मेष राशीत मार्गस्थ होणार असल्याने नवीन वर्ष 2024 अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंद आणू शकणार आहे. बृहस्पति मार्गी असल्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा काही ना काही परिणाम होतो. गुरु ग्रह मेष राशीत मार्गी असल्यामुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहुयात.

मेष रास

वर्षाच्या अखेरीस गुरु मार्गस्थ असल्याने या राशीच्या लोकांना केवळ लाभच मिळणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. अशा परिस्थितीत नोकरीबरोबरच आर्थिक लाभासोबत व्यवसायातही अफाट यश मिळू शकते. तुम्हाला काही मोठी जबाबदारीही मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते.  देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो.

धनु रास

गुरुच्या मार्गी स्थितीमुळे या राशीच्या लोकांना आराम मिळू शकणार आहे. तसंच यावेळी आरोग्य चांगले राहणार आहे. कौटुंबिक जीवन देखील चांगले जाणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे यश मिळवू शकतात. तुम्हाला तुमच्या पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर नवीन वर्षात असे करणे फायदेशीर ठरू शकते. व्यवसायात मोठे यश आणि आर्थिक लाभ होऊ शकतो. जोडीदाराच्या सल्ल्याने जे काही काम कराल त्यात यश मिळेल.

कुंभ रास

गुरुच्या मार्गी स्थितीमुळे या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. पैशाशी संबंधित समस्या संपू शकतात. बचत करण्यासोबतच तुम्ही तुमची बँक बॅलन्स वाढवण्यात यशस्वी होऊ शकता. तुमच्या कौशल्याचा विचार करून तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी बढती मिळू शकते. कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )