मुंबई : हिंदू धर्माला मानणारे अनेक लोक वास्तुवर प्रचंड विश्वास ठेवतात. वास्तूनुसार घर, जमीन, व्यवसाय यासह सर्व प्रकारची शुभ कामे करण्यावर त्यांचा विश्वास असतो. वास्तुमध्ये काही गोष्टी जमिनीवर पडणे अशुभ मानले जाते. वास्तुनुसार जर या 4 गोष्टी जमिनीवर पडल्या तर घरच्या लोकांना वाईट परिणामांना सामोरे जावे लागू शकते. आम्ही तुम्हाला या 4 गोष्टी सांगणार आहोत, ज्या चुकूनही जमिनीवर पडू देऊ नयेत.
दूध
आपण दूध गरम करण्यासाठी गॅसवर ठेवतो आणि विसरतो. त्यानंतर दूध उकळतं आणि जमीनीवर पसरतं. याशिवाय काहीवेळा दूध देताना देखील जमीनीवर सांडतं. असा प्रकार कधी तरी होत असेल तर काही काळजीचं कारण नाही. परंतु जर हे पुन्हा पुन्हा होत असेल, तर हे लक्षण आहे की तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचे वास्तव्य आहे आणि वास्तु दोष आहे.
तेल
तेल या द्रव्याचा संबंध थेट शनिदेवाशीआहे, शनीचा क्रोध टाळण्यासाठी लोक शनिवारी तेल दान करतात आणि मंदिरात तेलाचा दिवा लावतात. जर तेल जमिनीवर पडले तर ते अशुभ मानले जाते. वास्तुनुसार, यामुळे तुम्ही केलेले काम बिघडू शकते आणि कुटुंबात पैशाची कमतरता असू शकते.
मिठ
मीठाशिवाय अन्नाला चव येत नाही. पण जमिनीवर मीठ पडणे अशुभ मानले जाते. मीठ पडणे शुक्र आणि चंद्राशी संबंधित नकारात्मक परिणाम दर्शवते. वास्तू नुसार, घरात वारंवार मीठ पडणे हे तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचा वावर असल्याचे लक्षण आहे, जे दूर करणे अत्यंत महत्वाचे आहे.
पदार्थ
जेव्हा आपण अन्न खातो, तेव्हा काही खाद्यपदार्थ अनेकदा जमिनीवर पडतात. हिंदू धर्मात अन्न ही देवता मानली जाते आणि त्यांचा अपमान करणे अशुभ मानले जाते. कधीतरी अन्न जमिनीवर पडले तरी काही हरकत नाही, परंतु जर ते पुन्हा पुन्हा घडले तर समजून घ्या की आई अन्नपूर्णा तुमच्यावर रागावली आहे आणि तुमच्या घरात काही वास्तू दोष आहेत. हे टाळण्यासाठी, तुम्ही स्वयंपाकघरात आई अण्णा पूर्णा यांचे चित्र लावू शकता.
(नोट - या लेखातील माहिती सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे. 'zee २४ तास' याची खातर जमा करत नाही. )