Vastushahstra : घराच्या या दिशेला असावी गणपतीची मूर्ती, एका रात्रीत भाग्य उजळेल

घरात गणेशाची मूर्ती योग्य दिशेलाच असायला हवी. जेणेकरुन त्याचा आपल्या घरावर चांगला प्रभाव पडतो. 

Updated: May 17, 2022, 08:45 PM IST
Vastushahstra : घराच्या या दिशेला असावी गणपतीची मूर्ती, एका रात्रीत भाग्य उजळेल title=

Ganesh Murti Vastushahstra : हिंदू धर्मात गणेशाच्या पूजेला विशेष स्थान आहे. असे मानले जाते की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्रीगणेशाच्या पूजेने केल्यास ते कार्य कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होते. तसेच श्रीगणेशाच्या आशीर्वादाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन त्यांचे दुःख नष्ट होतात. पण वास्तूनुसार गणपतीची कृपा आपल्यावर तेव्हाच राहते जेव्हा त्याची योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी प्रतिष्ठापना केली जाते. गणेशाची मूर्ती घरात योग्य ठिकाणी बसवणे आवश्यक असते. असे केल्याने घरात सुख-समृद्धी राहते.

बुधवार हा गणेशाला समर्पित दिवस आहे. या दिवशी श्रीगणेशाची आराधना व उपवास केल्याने भक्तांवर श्रीगणेशाची कृपा आयुष्यभर राहते. तसेच एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर त्याला बळ प्राप्त होते. श्री गणेश शक्ती, बुद्धी आणि वाणीचे दाता मानले जातात. गणेशजींच्या कृपेने माणसाचे नशीब उजळते. वास्तूनुसार काही गोष्टींची काळजी घेतल्यास गणेशजींची कृपा प्राप्त होऊ शकते. वास्तूनुसार गणेशाच्या मूर्तीचे काय नियम आहेत ते जाणून घेऊया.

घरामध्ये या ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करा

वास्तुशास्त्रात गणेशमूर्तीच्या स्थापनेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. वास्तूनुसार गणपतीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते. वास्तू तज्ज्ञांच्या मते, गणेशाच्या स्थापनेसाठी घराची ईशान्य दिशा सर्वोत्तम आहे.

वास्तुशास्त्रानुसार काही दिशा देवतांसाठी योग्य नसतात. त्यानुसार घराच्या दक्षिण दिशेला विसरूनही गणपतीची स्थापना करू नका. घराची दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा असते असे मानले जाते. तसेच गणेशजींना जिथे बसवायचे आहे, तिथे कचरा किंवा शौचालय वगैरे असू नये हे लक्षात ठेवा. गणेशाची मूर्ती स्वच्छ ठिकाणी ठेवावी.

घरामध्ये गणपतीची मूर्ती बसवायची असेल, तर घरामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बसवण्याऐवजी धातू किंवा मातीपासून बनवलेल्या गणेशाची मूर्ती बसवावी. घरात उभ्या असलेल्या गणेशाच्या जागी बसलेल्या गणेशाची प्रतिष्ठापना करा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी राहते.