Vastu Tips | आर्थिक नुकसान टाळण्यासाठी घरात या दिशेला ठेवा सोफा, पाहा काय कारण?

घरात सोफा सेट करताना या गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर आर्थिक नुकसान अटळ  

Updated: May 28, 2022, 08:32 AM IST
Vastu Tips | आर्थिक नुकसान टाळण्यासाठी घरात या दिशेला ठेवा सोफा, पाहा काय कारण? title=

मुंबई : घरातील हॉलमध्ये किंवा काही ठिकाणी हॉल आणि घराबाहेरील ओटीवर सोपा सेट ठेवले जातात. येणाऱ्या पाहुण्यांना बसण्यासाठी तशी सोय आपल्या सोयीनुसार आणि जागेनुसार केली जाते. तुम्हीही हाच विचार करून जर घरात सोफा एडजेस्ट केला असेल तर थांबा. ही माहिती तुमच्यासाठी लाख मोलाची आहे. 

घरात आपल्या सोयीनुसार गोष्टी एडजेस्ट करणं केव्हाही उत्तम आहेच. पण वास्तूशास्त्रानुसार ते योग्य आहे का? याची पडताळणी होणं गरजेचं आहे. याचं कारण असं की वास्तुशास्त्रानुसार जर ती जागा योग्य नसेल तर त्याचे परिणाम नकारात्मक होतात. आर्थिक वृद्धी थांबते. 

घराच्या मुख्य दरवाजाला अनुसरुनच नेहमी सोफ्याची जागा ठरवली पाहिजे. जर तुमच्या घराचे दरवाजे उत्तरेला असतील तर दक्षिण किंवा पश्चिम दिशेनं सोफा ठेवणं शुभ मानलं जातं. तर घराचं दार पश्चिम दिशेला असेल तर दक्षिण आणि पश्चिम दिशेचा मधोमध सोपा ठेवायला हवा. 

L शेप सोफा जर तुम्ही घेत असाल किंवा तुमच्याकडे असेल तर त्यासाठी काही विशेष गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं आहे. L आणि U आकाराचा सोफा घरात ठेवणं खूप शुभं असतं, त्यामुळे आर्थिक वृद्धी होते. 

L आकाराचा सोफा दक्षिण दिशेला हवा. तर दुसरा भाग पश्चिम दिशेला असायला हवा. जेव्हा व्यक्ती या सोफ्यावर बसेल तेव्हा त्याचे तोंड हे उत्तर किंवा पूर्व दिशेला असायला हवे. 

U आकाराचा सोफा जर तुम्ही घेत असाल तर तो दक्षिण दिशेला ठेवायला हवा. तर बाकी उर्वरित भाग हे पश्चिम आणि उत्तरेला असायला हवेत. 

सोफा सेट करताना पूर्व दिशा सोडून बाकी घराचे दार असेल त्या दिशेनं सोफा ठेवता येऊ शकतो. पूर्व दिशेला मात्र बसणाऱ्या व्यक्तीचा चेहरा यायाला हवा हे गोष्ट विसरून चालणार नाही. 

सोफा घरात सेट करताना या चुका टाळा 
दिशा निवडण्यापलिकडे आणखी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. सोफ्याची वरून आणि सोफ्याखालून साफसफाई करणं गरजेचं आहे. सोफ्याशेजारी पोहोचताना कोणतीही गोष्ट वाटेत ठेवू नये. सोफ्यावर बसताना आवाज येणार नाही याची काळजी घ्या. 

सोफ्यावर कपडे किंवा इतर गोष्टींचा पसारा नको. सोफ्यावरचे कपडेही नेहमी स्वच्छ असायला हवेत. सोफ्याची काळजी घेणं गरजेचं आहे. सोफा स्वच्छ असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. 

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)