Jyotish Tips : वैवाहित जीवन रोमँटिक करायचं? मग कबुतरला खाऊ घाला 'ही' खास गोष्ट

Vastu Tips : घरात आर्थिक संकट जाणवतं असेल किंवा वैवाहिक जीवनात रोमान्स गायब झाला असेल तर ज्योतिष शास्त्रात एक उपाय सांगण्यात आला आहे. हा उपाय केल्यास तुमच्या घरावर पैशांचा पाऊस होईल असं, ज्योतिष शास्त्रात सांगण्याता आलं आहे. 

Updated: Dec 17, 2022, 08:42 AM IST
Jyotish Tips : वैवाहित जीवन रोमँटिक करायचं? मग कबुतरला खाऊ घाला 'ही' खास गोष्ट title=
Vastu Tips for Pigeon upay of money husband and wife Romance at Jyotish Tips nmp

Jyotish Tips for Pigeon : भारतीय लोक मेहनतीसोबत नशिबालाही खूप महत्त्व देतात. त्यामुळे ज्योतिष शास्त्र (Astrology), वास्तूशास्त्र (vastu tips) आणि देवधर्म करून भारतीय लोक आपले नशिब देण्याचा प्रयत्न करतात. आर्थिक संकट (financial crisis), नवरा बायकोमधील वाद (husband and wife), वैवाहिक जीवनातील रोमान्स (Romance) गायब होणं, विवाहबाह्य संबंध (Extramarital affair) अशा अनेक समस्यांवर ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. ज्योतिषशास्त्र मानणारा एक वर्ग भारतात आहे. त्यामुळे अशा अनेक संकटावर दैनदिन जीवनात काही उपाय केल्यास तुमच्या समस्या दूर होऊ शकतात असं म्हटलं जातं. जर तुमच्या घरावरील आर्थिक संकट दूर व्हावा असं तुम्हाला वाटतं असेल तर फक्त तुमच्या घरातील खिडकीत कायम येणाऱ्या पक्षाला एक खास गोष्टी खाऊ घाला. 

कबुतराला (pigeon) खाऊ घाला खास पदार्थ 

अनेक वेळा समस्यांवर उपाय म्हणून कबुतरांना खायला द्यावं असं सांगितलं जातं. आचार्य अनुपम जॉली यांच्यानुसार पक्ष्यांना राहूचा कारक मानला जातो. त्यांना तृप्त केल्याने राहूचे वाईट परिणाम दूर होतात. कोणत्या ग्रहामुळे तुम्हाला त्रास होत आहे याच्या आधारे काय खायला द्यावं हे सांगितलं जातं. (Vastu Tips for Pigeon upay of money husband and wife Romance at Jyotish Tips)

कबूतर शांती आणि प्रेमाचं प्रतीक 

शास्त्रात कबुतराला कामदेवाची पत्नी रती हिचे वाहन मानलं गेलं आहे. कबूतर हे प्रेम आणि शांतीचं प्रतीक देखील आहे. त्यांना विविध प्रकारचे धान्य खायला दिल्याने विविध ग्रहांचं अशुभ प्रभाव दूर होतात.

'हे' उपाय करा!

वैवाहिक जीवनात काही तणाव असेल, वाद सुरू असतील तर कबुतरांना ज्वारी खायला द्यावी. असं केल्याने पती-पत्नीमधील प्रेम वाढतं.

कुंडलीत राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव असेल तर कबुतरांना बाजरी खाऊ घालावी. यामुळे या दोन ग्रहांचं अशुभ प्रभाव दूर होऊन शुभ प्रभाव वाढतो. 

आर्थिक संकट दूर करण्यासाठी सात वेगवेगळी धान्यं (ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा, तांदूळ, माठ) घेऊन कबुतरांना खायला द्यावे. जर ही सात धान्यं उपलब्ध नसतील तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी-जास्त घेऊ शकता. या एका उपायाने घरात लक्ष्मी वास करते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)