Vastu Tips For Plants : वास्तूशास्त्रात झाडं- रोपं यांचं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. असं म्हटलं जातं की, घरात झाडं लावल्यामुळं वातावरण प्रसन्न राहतं. घरात सकारात्मक उर्जेचा वावर पाहायला मिळतो. पण, प्रत्येक झाड वास्तूच्या अनुशंगाने घराला फळतं असं नाही.
काही रोपं, झाडं अशीही असतात ज्यांच्या असण्याचा घरावर, कुटुंबावर नकारात्मक परिणाम होतो. परिणामी अशा झाडांना घरात न लावण्याचाच सल्ला दिला जातो. अशी झाडं कोणती ते एकदा पाहा...
बोनसाय (bonsai plants)- ज्योतिषविद्येमध्ये बोनसायचं झाड घरात लावणं वर्ज्य सांगण्यात आलं आहे. हे झाड दिसायला कितीही सुंदर दिसलं तरीही ते घरात नसणंच उत्तम असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. हे झाड प्रगतीमध्ये अडथळे आणतं, ज्यामुळं ते घरात नसणं कधीही उत्तम.
मेहंदीचं रोप - हातात मेहंदी लावणं शुभसूचक असलं तरीही त्याचं रोप घरात लावणं शुभ मानलं जात नाही. असं म्हणतात की, मेहंदीचं रोप नकारात्मक उर्जांच्या छायेत असतं, त्याकडे वाईट आत्मा आकर्षित होतात. त्यामुळं घरात मेहंदीचं रोप चुकूनही लावू नका.
वाचा : सुखी आयुष्यासाठी जपा गरुड पुराणातील 5 मंत्र, सर्व दु:ख क्षणात होतील दूर
चिंच- चिंचेच्या झाडामध्ये प्रचंड नकारात्मक उर्जा असते. किंबहुना कुणालाही चिंचेचं रोपही भेट म्हणून देनं कदापि योग्य नाही. असं केल्यास त्या व्यक्तीसोबतच्या नात्यात मीठाचा खडा पडतो आणि नवे वाद डोकं वर काढतात.
(वरील माहिती सर्वसामान्य मान्यांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)