Shukra Uday In August 2023: वैदिक शास्त्रांमध्ये प्रत्येक ग्रहाला स्वतःचं महत्त्व आहे. वैदिक शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर गोचर करतात. तर काही ग्रह अस्त आणि उदय होतात. शुक्राचं गोचर सर्व 12 राशीच्या लोकांच्या जीवनासाठी महत्त्वपूर्ण मानलं जातं. शुक्र ग्रह हा सर्व भौतिक सुखांचा कारक मानला जातो. शुक्र सध्या कर्क अस्त असून अवघ्या 2 दिवसांनी म्हणजेच 18 ऑगस्टला शुक्राचा उदय होणार आहे.
18 ऑगस्टला संध्याकाळी 7.17 वाजता शुक्राचा कर्क राशीचा उदय होणार आहे. अशा परिस्थितीत हा काळ काही लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरणार आहे. शुक्र ग्रहाच्या अस्तामुळे लोकांच्या जीवनात धन, ऐश्वर्य आणि भौतिक सुखे येतात. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीला वैवाहिक सुख, प्रसिद्धी या गोष्टी मिळणार आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना शुक्राच्या उदयाचा फायदा होणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीतील शुक्राचा उदय मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळात या राशीच्या व्यक्तींना सर्व समस्यांपासून मुक्ती मिळणार आहे. तुमच्या कुटुंबात सुख परत येईल. त्याचप्रमाणे कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहणार आहे. एखाद्यासोबत भागीदारीत काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर ते अनुकूल आहे. मालमत्ता आणि वाहने इत्यादी खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल.
शुक्राचा उदय कर्क राशी असल्याने या राशीच्या लोकांसाठी शुक्र शुभ ठरणार आहे. यावेळी तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण निर्माण होईल. मालमत्ता इत्यादींमध्ये पैसे गुंतवले जाऊ शकतात. वैवाहिक जीवनासाठी हा काळ शुभ आहे. आर्थिक लाभाच्या दृष्टीनेही हा काळ चांगला आहे. या कालावधीत विद्यार्थी परदेशात शिक्षण घेऊ शकतात.
या राशीच्या लोकांसाठी शुक्राचा उदय फायदेशीर असणार आहे. कर्क राशीतील शुक्राचा उदय मकर राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होणार आहे. शेअर मार्केट, सट्टेबाजी आणि लॉटरीमध्ये नफा होऊ शकतो.कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणारे विद्यार्थी विजयी होऊ शकतात. विवाहासाठीही हा काळ अतिशय योग्य मानला जातो. कर्क राशीत शुक्राच्या उदयामुळे व्यावसायिक जीवनात सुधारणा होईल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )