Virgo Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे कन्या राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. (Virgo April 2024 Horoscope Kanya Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi)
कन्या राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना भावनिक आणि मानसिकदृष्ट्या त्रासदायक असणार आहे, असं टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांची भविष्यवाणी आहे. त्या म्हणतात की, तुम्ही कुठल्या प्रकारच्या गोष्टीकडे आकर्षित किंवा व्यसनी होऊ शकता. मात्र तुमच्यामध्ये ती शक्ती आहे, कितीही कठीण प्रसंग असला तरी तुम्ही त्यातून बाहेर निघण्याची ताकद ठेवतात.
करिअरबद्दल बोलायचं झालं तर, कामाच्या ठिकाणी तुमचे बॉस किंवा वरिष्ठ तुमच्या कामाबद्दल ऑथॉरेटीमध्ये असणार आहेत. त्यामुळे तुम्ही खपू जास्त त्रस्त असणार आहात. खूप जास्त तुम्हाला श्वास गुदमरल्यासारखा वाटू शकतो. जर तुमचा स्वत:चा व्यवसाय आहे तर तुमच्या इगो किंवा रागामुळे तुमचं नुकसान होणार आहे. त्यामुळे थोडं सतर्क राहून काम करा.
एप्रिल महिन्यात खूप जास्त सतर्क राहा कारण या महिन्यात तुमचे महत्त्वाचे कागदपत्र किंवा महत्त्वाची वस्तू हरवू शकते. त्याशिवाय या महिन्यात तुम्हाला धोकादेखील मिळू शकतो. त्यामुळे कुठल्याही घोटाळ्यापासून दूर राहा. डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका.
नातेसंबंधासाठी एप्रिल महिना चांगला नाही. नातेसंबंधामुळे तुम्ही दुखवल्या जाणार आहात. तुमच्या जोडीदार किंवा प्रिय व्यक्तीसोबत गैरसमज होणार आहे. कोणा स्पेशल व्यक्तीला तुम्ही मिस करणार आहात. भावनिकदृष्ट्या तुम्हाला कमजोर वाटणार आहे. त्यामुळे नात्यांमध्ये संतुलन राखा.
तुमच्या आरोग्याला टेक टू ग्रांटेड बिलुकल घेऊ नका. रुटीनमध्ये या आणि तुमच्या लाइफस्टाइलवर लक्ष केंद्रीत करा. पैशाबद्दल बोलायचं झालं तर हा महिना ठिक असेल. पैसे मिळणार पण या महिन्यात कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करु नका.
कन्या राशीच्या लोकांना एप्रिल महिन्यात सावधपणे पुढे जायचं आहे. निगेटिव्हीपासून दूर रहा. तुमचे जे शुभचिंतक आहे, जे तुमच्या रोजच्या आयुष्यातील गोष्टींसाठी मदत करतात त्यांना प्रत्येक शनिवारच्या दिवशी चहा बनवून द्यावे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)